शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

तुमचे पिण्याचे पाणी किती शुद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:39 IST

हिंगोली शहरातील पाणी पुरवठा योजना नवीनच आहे. शहरात २०१४ पासून योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे गळती नसल्याने दूषित पाण्याचा ...

हिंगोली शहरातील पाणी पुरवठा योजना नवीनच आहे. शहरात २०१४ पासून योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे गळती नसल्याने दूषित पाण्याचा प्रश्न नाही. तरीही काही अडचण होऊ नये, यासाठी दर महिन्यात ४० पाणी नमुने तपासले जातात. शहरात ९ जलकुंभ असून मंगळवारा २, अजयनगर १, पलटन १, खटकाळी बायपास १, गारमाळ १, नेहरूनगर १, आदर्श काॅलेज २ या ठिकाणी आहेत. दररोज ११.५ एमएलडी पाणी शहरातील सर्व जलकुंभांमध्ये भरले जाते. मग या टाक्यांतून ठरावीक दिवशी ठरावीक भागात पुरवठा होतो. १६ प्रभागात ४० पाणी नमुने घेतले जातात. कधी सुरुवातीच्या भागातील तर कधी शेवटच्या भागातील असे रॅण्डम नमुने घेऊन सगळीकडील पाणी तपासले जाते. त्यात काही दाेष आढळला तर दुरुस्ती केली जाते. क्लोरिनचे पाण्यातील प्रमाणही तपासले जाते. त्यातही काही कमी-अधिक आढळल्यास त्यातही बदल केले जातात. याशिवाय जिल्हा रुग्णालयही अधूनमधून नमुने घेते. तेही तपासणी करून काही दोष आढळल्यास कळवतात.

१६ प्रभागातून घेतले जातात पाण्याचे नमुने

पाण्याचे नमुने घेण्यासाठी ठरावीक अशी ठिकाणे निश्चित नाहीत. प्रत्येक वेळी वेगळ्या भागातील नमुने घेतले जातात. आठवड्यात १० नमुने घेतले जातात. शहरात १६ प्रभाग असून त्यातील १० प्रभाग प्रत्येक वेळी नमुने घेऊन सहभागी केले जातात. नगरपालिकांना हे पाणी नमुने घेऊन दूषित पाणी पुरवठा होणार नाही, असे बंधन घालण्यात आले आहे. केंद्र शासनाला याबाबतचा अहवाल पाठविणे बंधनकारक आहे. तो जिल्हा प्रयोगशाळेचाच लागतो.

अशी हाेते तपासणी

नगरपालिकेच्या पथकाकडून सर्वप्रथम पाण्याच्या टाकीवरच नमुने घेतले जातात. आलेले पाणी किती शुद्ध आहे, हे तपासले जाते. त्यानंतर एका पाण्याच्या टाकीवरील पहिल्या टप्प्यातील, मध्यभागातील व टोकाच्या भागातील पाणी नुमने घेतले जातात.

घेतलेले पाणी नमुने जिल्हा प्रयाेगशाळेकडून तपासून घेतले जातात. न.प. शिवाय आरोग्य विभाग व खासगी यंत्रणांकडूनही अनेकदा पाण्याची तपासणी केली जाते.

नगरपालिकेकडून शहराला ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तसेच शुद्ध पाणी पुरवठा करण्याकडे नगरपालिकेचा कटाक्ष असतो. त्यासाठी दरमहा पाणी नमुने घेऊन प्रत्येक प्रभागातील किमान दोनदा पाणी तपासणी केली जाते. दोष आढळत नाही. आढळलाच तर दुरुस्ती केली जाते.

- डाॅ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी, हिंगोली