शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रक्त तुटवड्यामुळे रूग्णांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:55 IST

जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रूग्ण व नातेवाईकांची धावपळ सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रूग्ण व नातेवाईकांची धावपळ सुरू आहे.दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यातच शाळा-महाविद्यालयांना सुट्या असून लग्नसराईमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी, जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत रक्त पिशव्यांची कमतरता भासत आहे. शिवाय शासकीय रक्तपेढीतून खासगी रूग्णालयातील रूग्णांसाठीही टोल क्रमांक १०४ द्वारे रक्तपिशव्यांचा पुरठा केला जातो. २०१७ मध्ये टोल फ्री क्रमांक १०४ वरून आलेल्या रूग्णांना विविध गटाच्या ८१६ रक्त पिशव्यांचा पुरवठा करण्यात आला. तसेच जानेवारी २०१८ मध्ये ४४ बॅग, फेबु्रवारीत ९२, मार्चमध्ये ६७ आणि एप्रिलमध्ये ६५ रक्त रक्त बॅगचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. रक्त पिशव्यांची मागणी जास्त अन् रक्तसाठा मोजका यामुळे रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. ऐनवेळी गरजू रूग्णास जर रक्त दिले नाही, तर रूग्णांची प्रकृती अधिक खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी रूग्ण दगावण्याचीही शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.जिल्हा सामान्य रूग्णायातील रक्तपेढीत सध्या ए पॉझिटीव्हच्या २ बॅग उपलब्ध आहेत. तसेच ए-निगेटीव्हच्या २, बी-पॉझिटीव्ह १६ बॅग, बी-निगेटीव्हच्या ४, एबी-पॉझिटीव्ह २, एबी-निगेटीव्ह केवळ १ ओ-पॉझिटीव्ह ११, ओ -निगेटीव्हच्या ६ अशा एकूण ४४ बॅगा जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीतउपलब्ध असल्याची माहिती जिल्हा रूग्णालयाततर्फे देण्यात आली. जास्तीत जास्त सामाजिक संघटना तसेच युवकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन डॉ. स्वाती गुंडेवार यांनी केले आहे. रक्तपेढीतील १४ जणांची टीम यासाठी कार्यरत आहे.जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीतून खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांनाही रक्त पुरवठा होतो. शासकीय रक्तपेढीपासून ४० किमी अंतरावरावरील खासगी रूग्णालयातील रूग्णांसाठी रक्त पुरवठा केला जातो.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य