इस्माईल जहागीरदार
वसमत (जि. हिंगोली) - मालेगाव मार्गावरील कन्हेरगाव फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवार रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पहाटे पर्यंत मयतांची ओळख पटली नव्हती.
वसमत मालेगाव मार्गावरील कन्हेरगाव फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्र एम एच ३८ एए ३८७१ स्लिप झाल्याने अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल काचमांडे, जमादार अविनाश राठोड यांच्या सह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आनले मयतांची पहाटे पर्यंत ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात होता. याप्रकरणी रविवार रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. झालेला अपघात ऐवढा भीषण होता की दुचाकीचा समोरील भाग छिन्नविछिन्न झाला होता.