शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींसाठी अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची तेलंगणा सीमेवरून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 18:20 IST

' दोन कोटी रुपये आणून दे, नाहीतर तुझ्या वडिलांचे प्रेत घेऊन जा.'

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : 'तुझे वडील आमच्या ताब्यात आहेत, तुझ्याकडे असलेले सोने दे किंवा दोन कोटी रुपये दे. तरच ते जिवंत मिळतील' अशी धमकी देत शहरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी बाळापुर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत काही तासातच तेलंगणा सीमेवरून अपहत व्यापाऱ्याची सुटका केली आहे. 

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथील तंबाखूचे व्यापारी शेख कादर मंगळवारी ( दि. 25) सकाळी शेवाळा रोड वरील बांधकामाची पाहणीसाठी गेले. मात्र, त्यानंतर कादर घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी दिवसभर त्यांचा शोध घेतला. ते कोठेच सापडले नसल्याने नातेवाईकांनी बाळापुर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या मोबाईलच्या सिग्नलवरून हदगाव, उमरी या ठिकाणी पोलीस व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाही.   

दरम्यान, बुधवारी (दि. 26) कादर यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलास शेखयूम शेख कादर याला फोन आला. यावेळी अनोळखी व्यक्तीने, 'तुझ्याकडील सोने किंवा दोन कोटी रुपये आणून दे, नाहीतर तुझ्या वडिलांचे प्रेत घेऊन जा.' अशी धमकी दिली. यानंतर पोलिसांनी तपासासाठी पथके विविध ठिकाणी रवाना केली. प्राथमिक माहितीनुसार ठाणेदार गणेश राहिरे, जमादार संजय मारके, पोना प्रशांत शिंदे, भालेराव यांचे पथक देगलूरकडे रवाना झाले. मात्र सायबर ब्रांचने अपहरणकर्ते व्यापाऱ्यासह तेलंगणा सीमेवर असल्याची माहिती पथकाला मिळाली. यावरून पथकाने उमरी तालुक्यातील हुंडा गावाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी आरोपींना पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात आले. दरम्यान, आरोपींच्या संशयास्पद हालचालीवरून ग्रामस्थांना संशय आला. त्यांनी धाडस करत आरोपींच्या ताब्यातून व्यापाऱ्याची सुरक्षित सुटका केली. याचवेळी पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र, अपहरणकर्ते पळून जाण्यास यशस्वी झाले. 

टॅग्स :KidnappingअपहरणPoliceपोलिसHingoliहिंगोली