शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

हिंगोलीचा सुपुत्र चांद्रयान-३ टीममध्ये; मोहीम यशस्वी होताच आई-वडिलांनी गावात वाटले पेढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 16:23 IST

दहावीपर्यंत झेडपी शाळेत घेतले शिक्षण, दोनवर्षांपासून इस्त्रोमध्ये आहे शास्त्रज्ञ

- इस्माईल जाहगीरदारवसमत (जि. हिंगोली): चांद्रयान-३ ने २३ ऑगस्ट रोजी यशस्वी कामगिरी केली असून या टीममध्ये हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा येथील महेश दिलीप काळपांडे शास्त्रज्ञाचा सहभाग आहे. या यशामुळे वसमत तालुक्यात जल्लोष साजरा केला जात असून कुरुंदा गावात आई- वडिलांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

महेश काळपांडे यांचे प्राथमिक शिक्षण कुरूंदा येथे झाले आहे.शास्त्रज्ञ होऊन मोठेपणी भारताचे नावलौकीक करायचे असे महेश लहानपणापासून म्हणायचे. त्यांचे स्वप्न पथकात सहभाग घेऊन पूर्ण झाले आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान- ३ चंद्रावर उतरले. तेंव्हा वसमत तालुक्यासह कुरूंदा येथे जल्लोष करण्यात आला. दिवाळी सारखी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

२२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाली. त्यानंतर ती मोहीम अंशतः अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इस्रोने नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २:३५ वाजता झाले. पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून १०० किमी गोलाकार ध्रुवीय कक्षाचे इंजेक्शन यशस्वीरित्या पूर्ण झाले. लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशाजवळ उतरले.  या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अंतराळ यान यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लॅंडिंग करणारा चौथा देश बनला.

महेश काळपांडे कोण आहेत...महेश यांचे वडील दिलीप काळपांडे डॉक्टर आहेत. तर वसमत तालुक्यातील सेलू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आई मालाबाई दिलीप काळपांडे या शिक्षिका आहेत. कुरुंदा येथील जि.प. शाळेत १० वी पर्यंत महेशचे शिक्षण झाले. त्यांनंतर त्यांनी लातूर येथील राजश्री शाहू विद्यालयात १२ वी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे पुणे येथे ‘एमटेक’ व इस्रोसाठी स्पर्धा परीक्षा दिली ,दोन वर्षांपूर्वी त्याची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली, त्यास सुरुवातीस अंटार्टिका येथे एक वर्ष प्रशिक्षण दिले त्यानंतर बंगळुर येथे नियुक्ती मिळाली.

हिंगोली जिल्ह्यातील लोकांना गर्व आहे...चांद्रयान -३ भारताने यशस्वी केली आहे. या चांद्रयान- ३ या टीममध्ये आमचा मुलगा आहे. मुलगा म्हणून आम्हाला आनंद आहेच. पण हिंगोलीकरांना महेशचा सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया महेशचे वडिल डॉ. दिलीप काळपांडे व आई माला काळपांडे यांनी दिली.

टॅग्स :Hingoliहिंगोलीisroइस्रो