शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीचा पारा ४१ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:15 IST

मागील आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून उन्हाचा पारा ४१ अंशावर गेला आहे. पुढील चार दिवस हिंगोलीकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील आठ दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून उन्हाचा पारा ४१ अंशावर गेला आहे. पुढील चार दिवस हिंगोलीकरांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरत असून त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे अंगाची काहिली होऊ लागली आहे. वाढत्या तापमानामुळे वातावरणात बदल होऊन चिमुकल्यांना विविध आजारही जडत आहेत. त्यामुळे उन्हापासून बचावाकरीता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी शहरात फळे व उस रसवंतीची गाडे, तसेच थंडपेयांची विविध दुकाने थाटली आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र कक्षउष्माघात झाल्यास रूग्णाला तात्काळ उपचार मिळणे आवश्यक आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी, व वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात माहिती संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. स्थापन करण्यात आलेल्या उष्माघात कक्षातील माहिती दररोज दोन तासांनी आरोग्य अधिकाºयांना पाठविण्यात येईल. त्यानंत ही सर्व एकत्रीत माहिती राज्यस्तरावर पाठविली जाणार आहे. संबधित आरोग्य यंत्रणेस उष्माघात कक्षात नेहमी सजग राहण्याच्या सूचनाही आहेत.उष्माघातापासून सावधान..४सर्वांनीच उष्माघातपासून बचावासाठी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. दुपारी १२ ते ३ यावेळेत उन्हात घराबाहेर पडू नये, शिळे अन्न खाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. मद्य, चहा, कॉफी, प्राशन करू नये. सौम्य रंगाचे सैल कपडे वापरावेत. घराबाहेर पडताना रूमाल, टोपी किंवा छत्री सोबत घेऊन जावी. लहान मुलांना शक्यतोवर उन्हात घराबाहेर पडू न देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.जिल्हा आरोग्य विभागातर्फे स्थापन करण्यात आलेल्या स्वतंत्र उष्माघात कक्षात आवश्यक सुविधा करण्यात आली आहे. कक्षात, थंड वातावरण, कुलर व फॅन व्यवस्था केल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा...४ उष्माघातापासून बचावासाठी डॉक्टरांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. उन्हातून आल्यानंतर दम लागल्यास किंवा ताप आल्यास हे उष्माघाताचे लक्षण आहे. त्यामुळे रूग्णास तात्काळ उपचारासाठी घेऊन जावे, असे जिल्ह आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनी सांगितले. उन्हामुळे डोळे लाल होऊन डोळ्यांचे आजार उदभवू शकतात. त्यामुळे शक्यतोवर घराबाहेर पडताना चष्म्याचा वापर करावा असे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. किशन लखमावार म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHeat Strokeउष्माघात