शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीची लिगो वेधशाळा घेणार ब्रम्हांडाचा धांडोळा; जगातल्या तिसऱ्या वेधशाळेच्या कामास गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 13:05 IST

प्रयोगशाळेच्या कामाला मिळणार गती, पूर्वी केवळ भूसंपादनाचे झाले होते काम; हिंगोलीकरांच्या आनंदाला उधाण

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडी - दुधाळा परिसरात गुरुत्वीय लहरींच्या सूक्ष्म अभ्यासासाठी होणाऱ्या प्रयोगशाळेला केंद्र शासनाने मंजुरी दिल्याने हिंगोलीकरांच्या आनंदाला उधाण आले आहे. सन २०१६ पासून चर्चेत असलेल्या या प्रकल्पाला निधी नसल्यामुळे केवळ जमीन भूसंपादनाची प्रक्रियाच पूर्ण झाली होती. आता केंद्राने मंजुरी दिल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे.

प्रकल्पाला सन २०१६ मध्ये केंद्र शासनाने प्राथमिक मंजुरी दिली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेझर इंटरफेरोमीटर ग्रेव्हिटेशनल-वेव्ह ऑब्जर्वेटरी प्रकल्पासाठी २२५ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली होती. ही जमीन सन २०२१ मध्ये प्रकल्पाला हस्तांतरितही करण्यात आली होती. मात्र, या प्रयोगशाळेच्या मुख्य कामाला सुरुवात होण्यासाठी केंद्र शासनाकडून मंजुरी मिळणे गरजेचे होते. आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी तब्बल दाेन हजार ६०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेच्या कामाला गती मिळणार आहे.

वसाहतीच्या कामालाही प्रारंभ...हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या लिंबाळा मक्ता भागात या ठिकाणी काम करणाऱ्या शास्त्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांसाठी वसाहत उभी केली जात आहे. या वसाहतीच्या कामालाही प्रारंभी झाला आहे. वसाहत व रस्त्यांसाठी जमीन भूसंपादन प्रक्रियाही पार पडली आहे.

जगातील तिसरी वेधशाळा...गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या दोन प्रयोगशाळा अमेरिकेत अस्तित्वात आहेत. नासाकडून त्यांचे परिचालन होते. आता जगातील तिसरी प्रयोगशाळा अंजनवाडा- दुधाळा परिसरात उभारली जाणार आहे. आयुकाचे शास्त्रज्ञ व नासाशी संबंधित अधिकारी या ठिकाणी अनेकदा भेटी देऊन गेले आहेत.

प्रयोगशाळा मंजुरी फायद्याची : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरऔंढा तालुक्यातील अंजनवाडी- दुधाळा परिसरात होणाऱ्या लायगो इंडियाच्या प्रयोगशाळेचा विकासाच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याला फायदा होणार आहे. तर संशोधनाच्या दृष्टीतून जगाला फायदा होणार आहे. प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या रोजगारांच्या मोठ्या संधीही उपलब्ध होतील. या प्रकल्पाची जागा हस्तांतरित झाली असून, वसाहतीचे कामही सुरू आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

शास्त्रज्ञांच्याही भेटीगाठी वाढतील : प्रो. संजित मित्राकेंद्राने लिगोच्या प्रत्यक्ष कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हळूहळू बांधकामेही सुरू होतील. अमेरिका व या वेधशाळा संदर्भातील शास्त्रज्ञांच्या भेटीगाठी वाढणार असल्याची माहिती आयुकाचे शास्त्रज्ञ प्रोफेसर संजित मित्रा यांनी दिली आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीscienceविज्ञान