शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

छपरा रेल्वेसाठी हिंगोलीकर एकवटले, तिरूपती- अमरावती एक्सप्रेस रोखली

By रमेश वाबळे | Updated: November 23, 2022 18:09 IST

हिंगोलीमार्गे नियोजित असलेली छपरा एक्सप्रेस पूर्णा- अकोला या रेल्वे मार्गाऐवजी जालनामार्गे वळविण्यात आली.

हिंगोली : छपरा एक्सप्रेस रेल्वे पूर्व नियोजनाप्रमाणे पूर्णा- हिंगोली- अकोला मार्गे सोडावी, वाशीम- हिंगोली- वसमतमार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडी सुरू करावी यासह इतर मागण्यांसाठी २३ नोव्हेंबर रोजी हिंगोलीकरांच्या वतीने बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन छेडण्यात आले. सकाळी ११ वाजता तिरूपती- अमरावती एक्सप्रेस रेल्वेगाडी काही वेळी रोखून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

हिंगोलीमार्गे नियोजित असलेली छपरा एक्सप्रेस पूर्णा- अकोला या रेल्वे मार्गाऐवजी जालनामार्गे वळविण्यात आली. त्यामुळे हिंगोली- वाशीम मार्गावरील प्रवाशात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. छपरा एक्सप्रेस पूर्व नियोजनाप्रमाणे पुर्णा- अकोला मार्गे सोडण्यात यावी, मुंबईला जाणारी रेल्वे गाडी चालू करण्यात यावी तसेच हिंगोली जिल्ह्यातील व्यापार पेठेकरीता अत्यावश्यक असलेले गुड्स शेड तात्काळ उभारण्यात यावेत, या मार्गावरील बंद असलेल्या सर्व पॅसेंजर, एक्सप्रेस रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू सुरू करण्यात याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

सकाळी ८.३० वाजता रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापारी, नागरिक शहरातील महात्मा गांधी चौकात जमले होते. या ठिकाणाहून व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यासाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला साद देत व्यापाऱ्यांनीही प्रतिष्ठाणे बंद ठेवत आंदोलनात सहभाग नोंदविला. तर सकाळी ११ च्या सुमारास रेल्वे स्टेशन गाठत तिरूपती - अमरावती रेल्वे काही वेळ रोखून मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी छपरा रेल्वे हिंगोलीमार्गे धावलीच पाहिजे, मुंबईसाठी एक्सप्रेस गाडी मिळालीच पाहिजे अशा घोषणा दिल्या.  या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीrailwayरेल्वे