शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्हा परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:31 IST

नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थितीत ८ विभागातील पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देप्रभारीराजमुळे वाढतोय कामाचा ताण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नेहमीच कोणत्याही कामात सक्रिय असलेल्या जिल्हा परिषदेला मागील काही महिन्यांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने प्रभारीवरच कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे स्वत:चा पदभार सांभाळत प्रभारी पदाचाही काभार पाहता - पाहता अधिका-यांच्या नाकी नऊ येत आहेत. सध्यास्थितीत ८ विभागातील पदे रिक्त आहेत.जि.प.त एकूण १५ पैकी ८ विभागात प्रमुख अधिकाºयांचेच पद रिक्त असल्याने प्रभारी अधिका-यांवर सोपविला आहे. त्यामुळे संबंधित अधिका-यावर कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यातच अधून मधून सुरु असलेल्या बैठकीने तर प्रभारी अधिका-यांसह कार्यालयातील कर्मचारीही व्यस्त राहतात. त्यामुळे इतर शासकीय कामे रेंगाळत असल्याचे चित्र आहे. आजघडीला ८ विभागाचा पदभार प्रभारीवर आहे. यामध्ये अतिरिक्त्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. देशमुख यांच्याकडे जिल्हा ग्रामणीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपद , सामान्यचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छताचा अतिरिक्त पदभार आहे. तर हिंगोली तालुक्याचे गणेश वाघ यांच्याकडे महिला व बालकल्याणचा उपमुकाअ पदाचा पदभार आहे, उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोेले यांच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी, क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गिते यांच्याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक समाज कल्याण आयुक्त कार्यालयामधील गीता गुठ्ठे यांच्याकडे समाजकल्याण अधिकारी, ग्रामीण पाठीपुरवठा विभागाचे कळमनुरीचे उपअभियंता सोमनाथ भागानगरे यांच्याकडे कार्यकारी अभियंता, सेनगावावत सहायक बीडीओ बी. जी. पंडित यांच्याकडेच बीडीओचा पदभार आहे. औंढ्याचे बीडीओ डॉ. सुधिर ठोंबरे यांना वसमतचा अतिरिक्त कारभार दिला आहे. त्यांना आपले मूळ कामकाज सांभाळत सांभाळत पदभार असलेल्या कार्यालयाचे कामकाज सांभाळावे लागत असल्याने ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या म्हणीचा प्रत्यय येत आहे.शासन उदासीन : वारंवार पाठपुरावाजि.प.ला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण हटायला तयार नाही. याबाबत शासनास अनेकदा अहवाल पाठवूनही काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. जि.प.तील रिक्त पदे भरण्यासाठी शासन तर उदासीन आहे. शिवाय पुढारीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे येथील प्रभारी अधिकारी कार्यालयाचे कामकाज आटोपता आटोपता स्त:हून भांबावून गेल्यागत झाले आहेत. एवढी नामांकित जिल्हा परिषदेचे जर रिक्त पदे भरली जात नसतील तर इतर विभागाची परिस्थती विचारण्याची गरजच नाही. तेथे तर अधिका-यांची वानवा आहे.