शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत बियाणांमध्ये भेसळीचा संशय; १०५ बियाणे नमुने पाठविले प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:41 IST

जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले.

हिंगोली : जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले. त्यामुळे अशा १०५ प्रकारच्या बियाणांचे नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, तपासणी अहवाल येताच संबंधित कृषि केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे.  

मागील चार ते पाच वर्षांपासून शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एके काळी ज्या शेतात क्विंटलने होणारे उत्पन्न आता किलोवर येऊन ठेपले आहे. मात्र भेसळयुक्त बियाणे विक्रीतून केंद्रचालक चांगलाच नफा मिळवित असल्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर आणि तालुका स्तरावर अशा एकूण सहा पथकाची नियुक्ती केली. 

पथकामार्फत कृषी केंद्रातील बियाणांचा धांडोळा घेऊन संशयित वाटलेल्या बियाणांचे नमुने घेतले जात आहेत. अशा प्रकारे एकूण १०५ प्रकारच्या बियाणांचे नमुने पथकाने जमा केले असून, ते शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविलेले आहेत. त्याचा येत्या काही दिवसांत अहवाल येणार असून, संबंधित ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. तर परवाना नसताना बी- बियाणे विक्री करणाऱ्या २२ कृषी केंद्रावरही कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास २५ लाख रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे कृषी केंद्र चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुढील महिन्यात खताचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती जि.प. कृषी विभागाने दिली आहे. यामध्येही काही भेसळ आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. 

तक्रार दाखल करण्याचे आवाहन यंदा ७० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने केले होते. तरीही बऱ्याच शेतकऱ्यांनी आवाहनाकडे लक्ष न देता पेरणी आटोपली. मात्र जोरदार पाऊस होऊनही जर एखाद्या कंपनीच्या बियाणाची उगवणच न झाल्यास अशा शेतकऱ्यांनी मात्र घाबरून न जाता जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर कृषी विभागातर्फे उपलब्ध करून दिलेल्या तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा. जेथून बियाणे खरेदी केले त्याची पावतीसह इतर कागदपत्रांद्वारे तक्रार दाखल करावी. त्याची आठ दिवसांत समितीद्वारे चौकशी करून शेतकऱ्याच्या हातात अहवाल दिला जाणार आहे. तो अहवाल पुढील कारवाईसाठी उपयोगी पडणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषि अधिकारी अंकुश डुब्बल यांनी सांगितले. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली