शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत पिस्टलच्या धाकावर परभणीच्या व्यापाऱ्याचे अडीच लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:28 IST

आडगाव रंजे परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्यास व त्यांच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांना पिस्टलचा धाक दाखवून लुटले

ठळक मुद्देजवळा बाजार येथील दुकानदारांकडून किरकोळ वसूली करून दुचाकीने परतत होते काही क्षणातच चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. 

जवळा बाजार ( जि. हिंगोली ) : हिंगोली-परभणी मुख्य रस्त्यावरील आडगाव रंजे परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्यास व त्यांच्यासोबत असलेल्या दोन साथीदारांना पिस्टलचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २ ) रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आज सकाळी पावणेचार वाजेच्या सुमारास लुटारूविरूद्ध विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, दिनाराम दर्गाराम चौधरी रा. परभणी हे औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील दुकानदारांकडून किरकोळ वसूली करून दुचाकीने केवाराम चौधरी व अनिस युनूस पठाण या दोन साथीदारांसह पभरणीकडे जात होते. परंतु अचानक काही चोरट्यांनी दिनाराम चौधरी यांची दुचाकी हिंगोली-पभरणी रस्त्यावरील आडगाव रंजे परिसरात अडविली. यावेळी चोरट्यांनी दिनाराम चौधरी व त्यांच्या साथीदारांना मारहाण करत पिस्टलचा धाक दाखवून अडीच लाखांची रोकड पळविली. काही क्षणातच चोरटे घटनास्थळावरून पसार झाले. 

सायंकाळचे सहा वाजल्याने येथील परिसरात शुकशुकाट होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधत तिघांना लुटून रोकड लंपास केली. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये फिर्यादी दिनाराम चौधरी व त्यांच्या सोबत असलेले अनिस युनूस पठाण हे जखमी झाले असून या दोघांवर परभणी येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ३ डिसेंबर रोजी सकाळी ३.४५ वाजेच्या सुमारास वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि डी. टी. मुलगीर हे करीत आहेत. 

ठाण्यातील दुरध्वनी क्रमांक बंद वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यातील नागरिकांच्या सेवेसाठी असणारा टेलिफोन व मोबाईल क्रमांक मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास पोलिसांशी थेट संपर्क होत नाही. शिवाय संबधित बिट जमादारही वेळेत घटनास्थळी पोहचत नाहीत. ही बाब गंभीर असून ठाण्यातील दुरध्वनी सेवा सुरू करण्याची मागणीही ग्रामस्थांतून होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडाHingoliहिंगोली