शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

हिंगोलीच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:53 IST

लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. या मतदारसंघात काँग्रेस व शिवसेनेतच काट्याची लढत झाली.

ठळक मुद्देमतदार राजाचा फायनल कौल कळणारकोणाच्या विजयाचा होणार जल्लोष ?सकाळी आठपासून सुरू होणार मतमोजणी

हिंगोली : लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. या मतदारसंघात काँग्रेस व शिवसेनेतच काट्याची लढत झाली. या दोन्हीपैकी एका पक्षाच्या गळ्यात विजयमाला पडणार आहे. २३ रोजी मतमोजणीनंतर तो कोण? हे स्पष्ट होणार आहे. मात्र एक्झिट पोलनंतर राजकीय चर्चांना ऊत आला आहे.हिंगोली लोकसभेचे मतदान १८ एप्रिलला झाले. तेव्हापासून आजपर्यंत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते नुसत्या निवडणुकीच्या गप्पा व विजयाची गणिते लावून हैराण आहेत. आता प्रत्यक्ष मतमोजणीची तारीख आली आहे. यात विजयाची गणिते जुळविणारे संदेश पहिल्याच टप्प्यात काँग्रेस, शिवसेना व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून फिरविले जात होते. आता समाज माध्यमांवर कोण जिंकणार आहे, याची चर्चा होताना दिसत आहे. काँग्रेस कार्यकर्ते कळमनुरी, उमरखेड, हदगाव व किनवट या मतदारसंघात मताधिक्य मिळणार असल्याने विजय आमचाच, असे सांगत आहेत. तर शिवसेनेकडून हिंगोली, वसमत, उमरखेड, हदगाव व कळमनुरीतही मताधिक्य मिळेल असे सांगून विजयाची गणिते मांडत आहेत. त्यातच एकमेकांची दुबळी बाजू मांडताना काँग्रेसच्या संथ प्रचाराबाबत तर सेनेतील बंडाळीबाबत चर्चा होत आहे. यातून कुठे मताधिक्य घटले, कुठे मते वाढणार याचे दावे होत आहेत. तर सामाजिक गणितांचा आधार लावत वंचित आघाडीचाही विजय कसा होणार हे सांगितले जात आहे. त्यामुळे जनतेने नेमका कोणाला धक्का दिला ते कळणार आहे.कडेकोट बंदोबस्त, ४७१ पोलीस तैनातलोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. यावेळी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी दरम्यान पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक तसेच ४७१ पोलीस कर्मचारी तसेच १३ पोलीस निरीक्षक, सपोनि ४३, पोलीस उपअधीक्षक ३ तसेच एसआरपीएफचे १ व सीआपीएचे १ असे दोन प्लाटून कर्तव्य बजावणार आहेत.हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत असून तशी पुर्वनियोजन करण्यात आले आहे. सर्वांनी शांततामय वातावरण ठेऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. २३ रोजी मतमोजणीनंतर कोण विजयी होणार याबाबत जनताही उत्सूक असल्याचे चित्र आहे. शिवाय सगळीकडेच निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. अखेर मतपेटीत बंद झालेला कोणता उमेदवार विजयी होणार हे आज कळणार आहे. मतमोजणीच्या दिवशी लिंबाळा परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे कडेकोट बंदोबस्त असणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. दरम्यान, प्रत्येक हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल