हिंगोली : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी चांगले पर्जन्यमान झाले. सेनगाव तालुक्यात ४१ मिमी पाऊस झाला असून दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. यामध्ये गोरेगाव-सेनगाव रस्त्यावरील आजेगावनजीकचा पर्यायी पूल वाहून गेल्याने ३० ते ४० गावांचा संपर्क तुटला आहे.
रविवारी सकाळी आठपूर्वीच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १७.५५ मिमी पाऊस पडला. यामध्ये मंडळनिहाय पडलेला पाऊस असा आहे. हिंगोली तालुक्यात हिंगोली १४ मिमी, खंबाळा ८, माळहिवरा ६, सिरसम बु. ३, बासंबा ७, नरसी नामदेव ९, डिग्रस १४, कळमनुरी तालुक्यात कळमनुरी १९, नांदापूर ३, आखाडाबाळापुर २६, डोंगरकडा १२, वारंगा फाटा १०, वाकोडी २६, सेनगाव तालुक्यात सेनगाव ३०, गोरेगाव ९, आजेगाव ५५, साखरा ९९, पानकनेरगाव ४४, हत्ता ८, वसमत तालुक्यातील तालुक्यातील वसमत ३, गिरगाव १५, कुरुंदा १०, टेंभूर्णी ४, आंबा ५,हयातनगर २९,औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा ९,जवळा बाजार ११, येहळेगाव २४, साळणा ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.