शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

हिंगोलीत आतापासूनच निवडणुकांसारखे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:55 IST

लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी अजून बराच काळ बाकी आहे. मात्र त्यादृष्टीने आतापासूनच रणनीति आखली जात असून त्याचे पडसादही उमटू लागले आहेत. आमदारांची अवैध धंद्यांविरुद्धची मोहीम, स्टेजवरच होणारी शाब्दीक चकमक, बाजार समित्यांच्या पदाधिकारी निवडीतील घटना याचाच एक भाग आहेत.

ठळक मुद्देराजकीय स्पर्धकांत चढाओढ वाढली : राजकीय डावपेच आखतांना रंगतोय कलगीतुरा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी अजून बराच काळ बाकी आहे. मात्र त्यादृष्टीने आतापासूनच रणनीति आखली जात असून त्याचे पडसादही उमटू लागले आहेत. आमदारांची अवैध धंद्यांविरुद्धची मोहीम, स्टेजवरच होणारी शाब्दीक चकमक, बाजार समित्यांच्या पदाधिकारी निवडीतील घटना याचाच एक भाग आहेत.दीपावलीनंतर एकदमच हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील हालचालींची गती तेज झाली अन् नूरही पालटला आहे. खेळीमेळीच्या वातावरणाला आता स्पर्धा, इर्षा अन् खुन्नस या बाबींची किनार दिसू लागली आहे. बाजार समिती पदाधिकारी निवडीपासूनच याची झलक पहायला मिळत आहे. वसमतला तर दिवाळीपूर्वीच बाजार समिती निवडीवरून महाभारत घडले. राष्ट्रवादीतील गट-तटांना शिवसेनेने बळ दिले. त्यामुळे पक्षाची शकले तर पडली. मात्र कशीतरी माजी आ.जयप्रकाश दांडेगावकर या नावाभोवती ही मंडळी सध्या चिटकून आहे. कधी संधी मिळेल आणि स्फोट होईल, हे सांगता येत नाही. तर दुसरीकडे सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा यांना लोकसभेची संधी मिळाली तर आपल्याला विधानसभेचा गड लढता येईल का? याची चाचपणी काहीजण करीत आहेत. भाजपच्या लोकांना मात्र आपला नेता वसमतपेक्षा दिल्लीतच जास्त राहात असल्याची चिंता लोकांसमोर व्यक्त करण्यातच हैराण व्हावे लागत आहे.हिंगोलीत मात्र वेगळी परिस्थिती निर्माण झाली. मागच्या जि.प. व पं.स. निवडणुकीत खा.राजीव सातव व माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे गट-तटाचे राजकारण स्पष्टपणे दिसून आले. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीवाल्यांचे मनसुबे वाढले. वेगळे लढलो तर ठीक अन्यथा आघाडी झाली तरीही ही जागा राकाँला सुटेल, या आशेवर आ.रामराव वडकुते कामाला लागले आहेत. तर मागची विधानसभा राकाँकडून उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी लढली होती. या दोघांच्या कार्यकर्त्यांत व त्यांच्या रुपाने या दोघांत संघर्ष उभा राहात असल्याचे आता तर सार्वजनिक ठिकाणीही निदर्शनास येत आहे. यापूर्वी बंद खोलीत होणाºया चर्चा आता चव्हाट्यावर येत आहेत. तर हिंगोलीत शिवसेना व भाजपचा संघर्ष सर्वश्रुत आहे. बाजार समितीत तो चव्हाट्यावर येईल, असे वाटत असतानाच सेनेने भाजपला शरण जाणेच पसंत केले. मात्र आ.मुटकुळे आणि सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यातील तेढ कायमच दिसते. हे दोन पक्ष एकत्र लढो की वेगळे याचा परिणाम कुठेतरी दिसणारच आहे.हिंगोलीचे पडसाद कळमनुरीतही उमटत आहेत. विद्यमान आ.डॉ.संतोष टारफे हे एकदम सरळ स्वभावाचे. गावोगाव अवैध धंदे, दारूमुळे महिलांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडताच त्याचे राजकारण झाले. इतर आमदार यात सहभागी झाले अन् त्यामुळे मोहीम तर सुरू झाली मात्र ती फायद्याची की तोट्याची हा प्रश्नच आहे. याच ठिकाणी शिवसेनेचे संतोष बांगर व आता भाजपवासी झालेले माजी आ.गजानन घुगे यांच्यातील संघर्षही मागील काही दिवसांपासून स्पष्टपणे दिसून येत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी तेवढी उघडपणे रणांगणात येणे बाकी आहे.हे सगळे सुरू असले तरीही अजून लोकसभेलाच दीड वर्षांचा काळ असल्याचे कोणीही लक्षात घेत नाही. तर राज्य स्तरावर सत्ताधाºयांतील वादामुळे मध्यावधीच होणार की काय? असे वातावरण कायम राहात असल्याने तर ऐनवेळी तयारी नको म्हणून सगळेच कामाला लागत आहेत. त्यातून मतदारसंघातील घिरट्या, भेटी-गाठी इतक्या वाढल्या की जनताही चक्रावली आहे.