शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यात भरती झालेल्या हिंगोलीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 13:45 IST

सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल नामदेव पतंगे यानं राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. हिंगोली  जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे. 

हिंगोली, दि. 5 - सैन्यात भरती झालेल्या 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल नामदेव पतंगे यानं राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे. जिल्ह्यातील मौजे कामठा येथील ही घटना आहे. मंगळवारी ( 5 सप्टेंबर) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.  मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरीतालुक्यातील मौजे कामठा येथील रहिवासी असलेला तरुण अमोल नामदेव पतंगे (वय 19 वर्षे) हा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदपूर येथील भरतीपूर्व सैन्य प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी गेला होता. नुकताच तो सैन्यात भरती झाला होता. सोमवारी  (4 सप्टेंबर ) त्याने औरंगाबाद येथे कागदपत्रं जमा केले व  रात्री उशीरा घरी परतला. यानंतर दुस-या दिवशी सकाळी 8 वाजता त्यानं चुलतभावासोबत चहा  घेतला. त्यानंतर घरात एकटाच टीव्ही पहात बसला. 

आणि मग त्यानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातल्यांची ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने अमोलला बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते. मात्र त्याचं आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.  त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. घटनास्थळी ए.एस.आय. नागनाथ दीपक, पो.कॉ. प्रशांत शिंदे यांनी भेट दिली. दरम्यान, याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्या