शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत उद्योजकांकडे थकले तब्बल आठ कोटी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 19:07 IST

लिंबाळा ग्राम पंचायत हद्दीतील (एमआयडीसी) उद्योजकांकडे करवसुलीचे तब्बल आठ कोटी थकले आहेत.

हिंगोली : तालुक्यातील लिंबाळा ग्राम पंचायत हद्दीतील (एमआयडीसी) उद्योजकांकडे करवसुलीचे तब्बल आठ कोटी थकले आहेत. ग्रा. पं. ने वारंवार नोटिसा बजावूनही अद्याप करभरणा होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.

हिंगोली शहरालगतच्या लिंबाळा एमआयडीसीमधील विविध उद्योजक ग्रामपंचायतने आकारलेला कर भरण्यास तयार नाहीत. २०११ पासून प्रत्येक्ष-अप्रत्यक्षरीत्या कराची मागणी संबंधित उद्योजकांकडे ग्रामपंचायत करीत आहे. कर भरण्यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहारही करण्यात आला. मात्र एमआयडीसीतील एकाही उद्योजकाकडून प्रतिसाद मिळत नाही, शिवाय शासनाचा कर भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे हतबल झालेल्या ग्रामपंचायतीने आता करभरणा न केल्यास संबंधितांवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याची माहिती लिंबाळा ग्रामपंचायतकडून देण्यात आली आहे. 

इतर ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीतील उद्योजक कर भरणा करतात. यामध्ये औरंगाबाद, वाळूज, पंढरपूर, चिकलठाणा यासह विवध ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीत असलेले उद्योजक नियमाप्रमाणे कराचा भरणा करतात. परंतु हिंगोली येथील एमआयडीसीतील उद्योजक मात्र कर भरण्याकडे पाठ फिरवित आहेत. वेळोवेळी दिलेल्या नोटिसांना प्रतिसादही मिळत नाही. त्यामुळे आता लिंबाळा ग्रामपंचायतीने चक्क एमआडीसीतील मालमत्तेच्या जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जप्तीची कारवाई केली जाईल लिंबाळा येथील सरपंच अकबरखाँ हसनखाँ पठाण म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून एमआयडीसीमधील उद्योजकांनी कर भरला नाही. याबाबत वारंवार सांगूनही करभरणीकडे संबधित उद्योजक दुर्लक्ष करीत आहेत. अनेकदा नोटिसाही ग्रामपंचायतीने दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. तर लिंबाळा ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक प्रफुल्ल कदम यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, २०११ पासून १४६ जणांनी अद्याप कर भरणा केला नाही. वारंवार नोटिसाही बजावल्या. शिवाय प्रत्यक्ष भेटी देऊन कर भरण्यास सांगितले. परंतु उद्योजकांकडून कर भरला जात नाही. त्यामुळे आता जप्तीची कारवाई करण्यात येईल.

नियोजन बिघडलेलिंबाळा ग्रामपंचायतीला कर मिळत नसल्याने सगळे नियोजनच बिघडले आहे. शिवाय या औद्योगिक वसाहतीतील कामगारांना या भागात राहतात. वाढत्या वस्तीला सुविधा पुरविणे अवघड बनत चालले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीMONEYपैसाbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी