शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत निष्काळजीपणा चव्हाट्यावर; ११ तारखेला परीक्षा, ८ तारखेला १ हजार प्रश्नपत्रिका जळाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:45 IST

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिका पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ठेवल्या होत्या.

औंढा नागनाथ (जि.हिंगोली) : तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, पॅट (पिरॉडिक असेसमेंट टेस्ट) परीक्षेच्या १ हजार प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे ११ एप्रिल रोजी होणाऱ्या मराठी विषयाच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिका पंचायत समितीच्या शिक्षण विभागात ठेवल्या होत्या. याच ठिकाणी असलेल्या इन्व्हर्टर व यूपीएसमध्ये विद्युत दाब कमी-जास्त झाल्याने अचानक शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून लागलेल्या आगीत या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. विशेष म्हणजे, या प्रश्नपत्रिकांचे वितरण ८ एप्रिललाच होणार होते. मात्र, घटनेमुळे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे.

परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकानुसार ११ एप्रिल रोजी मराठी, १५ एप्रिल रोजी इंग्रजी आणि २२ एप्रिल रोजी गणित विषयाची परीक्षा होणार आहे. मात्र आता नव्याने प्रश्नपत्रिका उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. पुणे येथून या प्रश्नपत्रिका मागवणे अल्पावधीत शक्य नसल्याने प्रशासन अडचणीत आले आहे. तसेच बाहेरून झेरॉक्स काढल्यास प्रश्नपत्रिका फुटण्याचा धोका असल्याने पर्याय मर्यादित आहेत.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रश्नपत्रिका ठेवण्याच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था नसणे व विद्युत यंत्रणांची तपासणी न करणे हे गंभीर दुर्लक्ष मानले जात आहे. पॅट परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती व बोगस नोंदी तपासण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, या घटनेमुळे शिक्षण विभागाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दोन दिवसात प्रश्नपत्रिका मिळतील...तिसरी ते सहावी वर्गापर्यंतच्या १ हजार प्रश्नपत्रिका आगीत जळाल्या. प्राथमिक शिक्षण परिषद, पुणे यांच्याशी संपर्क साधला असून, दोन दिवसात प्रश्नपत्रिका मिळतील आणि मिळाल्या नाहीच तर झेरॉक्स काढून परीक्षा घेण्यात येईल.- मोहम्मद तौसिफ, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, औंढा नागनाथ.

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli Negligence Exposed: Exam Papers Burned Before Assessment

Web Summary : Aundha Naghnath education dept. negligence: 1,000 exam papers burned due to short circuit before the assessment. Marathi exam uncertain, new papers are needed.
टॅग्स :Hingoliहिंगोलीexamपरीक्षा