शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक ! हिंगोलीत कोरोना वॉर्डात रुजू डॉक्टर एका भेटीनंतरच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:57 IST

coronavirus जिल्हा रुग्णालयात काही नवनियुक्त परिचारिकांसह ग्रामीण भागातील १२ डॉक्टर कोरोना वार्डात सेवेसाठी नियुक्त केले होते.

ठळक मुद्देदोन विभागांत ताळमेळही नाही

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डात अपुरे मनुष्यबळ असल्याची ओरड सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रातील १२ डॉक्टरांची नियुक्ती येथे केली होती. मात्र त्यापैकी बहुतांश  डॉक्टर एका भेटीनंतर पुन्हा फिरकलेच नाही.

हिंगोली जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर कमी झाला आहे. मात्र तो अजून संपला नाही. मध्यंतरी जिल्ह्यात पाचशेच्या आसपास अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या पोहोचली होती. त्याचा परिणाम म्हणून उपलब्ध मनुष्यबळावरील ताण वाढला होता. त्यातच एवढे रुग्ण हाताळताना डॉक्टर व परिचारिकांची मोठी कसरत करावी लागत होती. 

जिल्हा रुग्णालयात काही नवनियुक्त परिचारिकांसह ग्रामीण भागातील १२ डॉक्टर कोरोना वार्डात सेवेसाठी नियुक्त केले होते. मात्र ते एकदा कोरोना वार्डात येवून गेले की, पुन्हा परतलेच नाहीत. मध्यंतरी एक वयस्कर डॉक्टर तेवढे सेवा बजावत होते. मात्र इतर कुणाचे काही होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनीही अंग काढून घेणे पसंत केले. त्यामुळे पुन्हा काही ठरावीक डॉक्टरांनाच अतिरिक्त ताण सोसावा लागत होता. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांना विचारले असता अनुपस्थितीबाबत आम्हाला कळविल्यास यावर निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले. ही बाब गंभीर असून यात निश्चितच योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस