शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात पतपुरवठ्याचे आकडे राहताहेत उद्दिष्टातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:46 IST

जिल्ह्याचे पतधोरण ठरविताना बँकांना पीककर्ज वाटपाचे १११८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना उद्योग, शिक्षण, गृहकर्ज आदीसाठी ६३२ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र कृषीप्रमाणेच त्यातीलही काही बाबींना बँकांची नकारघंटाच कायम असते. गृहकर्ज तेवढे देण्याचा प्रयत्न होतो.

ठळक मुद्देपीकर्जाशिवाय ६३२ कोटींचे उद्दिष्ट : ठराविक क्षेत्रातच कर्जपुरवठ्याकडे दिसतोय कल

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचे पतधोरण ठरविताना बँकांना पीककर्ज वाटपाचे १११८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले असताना उद्योग, शिक्षण, गृहकर्ज आदीसाठी ६३२ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र कृषीप्रमाणेच त्यातीलही काही बाबींना बँकांची नकारघंटाच कायम असते. गृहकर्ज तेवढे देण्याचा प्रयत्न होतो.हिंगोली जिल्ह्यात खरीप व रबी हंगामासाठी पीककर्जाचे १११८ कोटी रुपये वितरणाचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी सध्या शेतकरी बँकांच्या दारात आहेत. मात्र याशिवाय कृषीसाठी दीर्घमुदती कर्जाचे १६५ कोटी, कृषीत पायाभूत सुविधा उभारणीस ५२ कोटी तर इतर उपक्रमांसाठी २२.६२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे एकूण कृषी घटक १३५७ कोटींच्या घरात जाणारा आहे. दुसरीकडे लघुउद्योगांच्या उभारणी व विकासासाठी १७४.५0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु नवउद्योजकांना बँका फटकूही देत नाहीत. त्यामुळे हे आकडे उद्दिष्टातच राहतात, हा आजवरचा अनुभव आहे. माल निर्यातीसाठी ४.८0 कोटींपर्यंतचा कर्जपुरवठा करण्याचे नियोजन आहे. मात्र या भागातून कोणताच माल बाहेर जाईल, अशी स्थिती नाही.शिक्षणासाठी कर्जप्रकरणे करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र वैद्यकीय, अभियांत्रिकीसारख्या शाखेस प्रवेश घेणाºयांचीही कर्जप्रकरणे करण्यास बँका मागेपुढे पाहतात. शिक्षणासाठी १६.३0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. गृहकर्ज मात्र बँकांच्या आवडीचा विषय आहे. त्यातही शासकीय कर्मचारी-अधिकारी, मोठे व्यापारी अशांपैकी तगडी उलाढाल अथवा पगारपत्रक पाहून तत्काळ कर्जपुरवठा केला जातो. यात उद्दिष्ट ६२ कोटींचे असले तरीही त्यापेक्षा जास्तही वितरण केल्याचे पाहायला मिळते. अपारंपरिक उर्जा या प्रकरासाठीही १.७६ कोटी रुपयांपर्यतचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे.शासनाच्या विविध स्वयंरोजगाराच्या योजनांतील लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी १0३ कोटींचे उद्दिष्ट आहे. मात्र या संचिका बँकांकडे तशाच पडून राहतात, हा अनुभव आहे. याशिवाय इतर शासकीय उपक्रमांसाठी कंत्राट आदींच्या कामांना ३0.५५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. यातही अनेकांना कर्जपुरवठा केला जातो. ठराविक क्षेत्रांतील कर्जपुरवठा सोडला तर अन्य लाभार्थ्यांना आर्थिक कुवत नसल्याचे पाहून दूर ढकलले जाते.दरवर्षीचेच रडगाणेदरवर्षी विविध बँकांना उद्दिष्ट दिले जाते. त्यानंतर लाभार्थ्यांच्या संचिका तपासत आहोत, लवकरच उद्दिष्ट पूर्ण करू, अशी आश्वासने देत जिल्हा प्रशासनासमोरील बैठकांत वेळ मारून नेली जाते. अग्रणी बँकेचे अधिकारीही केवळ माना डोलावण्याचे काम करतात. प्रत्यक्षात या बँका कर्जपुरवठा मात्र करीत नाहीत.

टॅग्स :HingoliहिंगोलीbankबँकFarmerशेतकरी