शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात चार शेतकऱ्यांच्या नावे परस्पर उचलले पिककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 14:57 IST

तालुक्यातील जामदया येथे पिककर्ज घेण्यासाठी कधीच बँकेत न गेलेल्या चार शेतकऱ्यांचे नाव कर्ज माफीच्या यादीमध्ये आले.

ठळक मुद्देसेनगाव तालुक्यातील घटना एकूण ४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक

सेनगाव: दस्तऐवज तयार करून जामदया येथील चार शेतकऱ्यांच्या नावे येथील स्टेट बँक आँफ इंडिया बँकेच्या शाखेतून पिक कर्ज घेतल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यात एकूण ४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जामदया येथे पिककर्ज घेण्यासाठी कधीच बँकेत न गेलेल्या चार शेतकऱ्यांचे नाव कर्ज माफीच्या यादीमध्ये आले. आपले खोटे दस्तावेज देऊन एसबीआय बँकेच्या शाखेतून पीककर्ज परस्पर उचल्याचे स्पष्ट झाल्याने चारही शेतकऱ्यांना धक्काच बसला. याबद्दल अधिक माहिती घेतली असता अर्जुन पांडुरंग डाखोरे यांच्या नावे १ लाख ९९ हजार तर त्यांच्या मुलाच्या नावे २५ ऑगस्ट २०१६ ला ९० हजार,  गावातीलच अन्य दोघांच्या नावे ३० सप्टेंबर २०१६ रोजी प्रत्येकी ९० हजाराचे पिककर्ज मंजूर होऊन उचलण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चारही शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन खोटे दस्तऐवज तयार करून एकूण ४ लाख ६९ हजार रुपयांच्या फसवणुकीची तक्रार सेनगाव पोलिसात दाखल करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीCrop Loanपीक कर्ज