शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: सुरक्षा रक्षकावर विटांचा वर्षाव करून ज्वेलर्स शॉपीत धाडसी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:50 IST

चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील सुरक्षा रक्षकावर विटा फेकून हल्ला केला

सेनगाव : येथील नगरपंचायत कॉम्प्लेक्समधील गाडे ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर चोरट्यांनी मध्यरात्री शटर वाकवून प्रवेश करत सुमारे ३ लाख ४९ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही धाडसी चोरी ८ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील सुरक्षा रक्षक दाजीबा सुर्यतळ यांच्यावर विटा फेकून हल्ला केला, त्यामुळे ते जखमी झाले आहेत.

दुकानमालक मधूकर गंगाराम गाडे हे ७ जुलै रोजी रात्री दुकान बंद करून गावाकडे गेले होते. त्यानंतर रात्री चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडून आणि शटर वाकवून दुकानात प्रवेश मिळवला. त्यांनी नथ, मोरण्याचे जोड, चांदीच्या अंगठ्या, ब्रासलेट, चांदीचे चेन आदी दागिने चोरले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी जीवन मस्के, उपनिरीक्षक रविकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण व इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर चार अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी घोरदरी दरोड्याचा तपास नाहीपोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी भुसारे, आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनीही सकाळी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. यापूर्वी घोरदरी येथे घडलेल्या दरोड्याचा तपास न लागता, पुन्हा एक चोरी झाल्याने सेनगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली