शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली बनावट नोटा प्रकरण : पुसदला १० हजारांच्या बनावट, तर नागपूरमध्ये खेळणीतील लाखाच्या नोटा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 18:17 IST

हिंगोलीतील बहुचर्चित बनावट नोटांप्रकरणी पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देसंशयित आरोपींच्या घरांची झाडाझडती  खऱ्या नोटांमध्ये नकली नोटा घुसवून करायचे फसवणूक

हिंगोली : येथील बहुचर्चित बनावट नोटांप्रकरणी पोलिसांनी पुसद आणि नागपूर येथून अटक केलेल्या ३ संशयित आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली. त्यात पुसद येथील आरोपीच्या घरात १० हजारांच्या बनावट नोटा; तर नागपूर येथील आरोपीच्या घरातून लहान मुलांच्या खेळण्यातील १ लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संतोष सूर्यवंशी (देशमुख) याच्यासह अन्य तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांनी दिली. 

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे आणि एटीएसच्या पथकाने २ सप्टेंबर रोजी बळसोंड भागातील आनंदनगरात एका भाड्याच्या घरात थाटलेला नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करून मुख्य सूत्रधार संतोष सूर्यवंशी, छाया भुक्तार या दोघांना व नंतर पुसद येथील इम्रानखान अहमद खान पठाण आणि विनोद कुरडे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नागपूर येथून २ आणि पुसद येथून एका आरोपीस अटक केली. यामुळे सर्व आरोपींची संख्या ७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी संतोष सूर्यवंशीसह नंतर अटक केलेल्या तीन आरोपींना १० सप्टेंबर रोजी न्यायालयासमक्ष हजर केले असता सूर्यवंशीला १४; तर उर्वरित तिघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच तीन आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  तपास हिंगोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. ओमकांत चिंचोळकर, पोउपनि. मनोज पांडे, पोलीस कर्मचारी मधुकर पोले, गजानन पवार, भगवान मंडलीक, संदीप जाधव, रूपशे धाबे, महेश बंडे, शेख जमीर, गजानन दांडेकर, गणेश लेकुळे, दिलीप बांगर करीत आहेत. 

खऱ्या नोटांमध्ये नकली नोटा घुसवून करायचे फसवणूकनागपूरमधील आरोपीच्या घरातून लहान मुलांच्या खेळण्यातील (भारतीय चिल्ड्रेन बँक) १ लाखांच्या नोटा जप्त केल्या. खऱ्या नोटांमध्ये दोन ते तीन नकली नोटा घुसवून फसवणूक करण्याचा गोरखधंदा या माध्यमातून चालत होता. तसेच पुसद येथील आरोपीकडून १० हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रामेश्वर वैंजणे यांनी दिली.

विलास पवारला दिले सोडूनपांढरकवडा येथून ताब्यात घेतलेल्या प्रहार जनशक्तीचा माजी जिल्हाध्यक्ष विलास पवार याला मात्र चौकशीअंती सोडून देण्यात आले आहे. तीन दिवस याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात होती. 

टॅग्स :fraudधोकेबाजीHingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी