शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: थंडीचा परिणाम, पहिल्या चार तासांत वसमतमध्ये २१ तर हिंगोलीत १४ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:33 IST

हिंगोलीत शनिवारी सकाळपासून वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. ११ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात मतदानावर थंडीचा परिणाम झाल्याचे जाणवत आहे. सकाळी ७:३० वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला असून पहिल्या चार तासांमध्ये वसमतमध्ये केवळ २१ टक्के तर  हिंगोलीत १४ टक्के मतदान झाले आहे. 

वसमत नगरपालिकेतील नगराध्यक्षांसह नगरसेवक पदांच्या जागांसाठी शनिवारी सकाळी ७:२० वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात शनिवारी वातावरणात गारवा वाढलेला आहे. याचा परिणाम मतदानावरही दिसून आला. वसमत शहरातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळी ११:३० वाजेपर्यंत तुरळक मतदार मतदानासाठी दाखल झाले होते. ११:३० नंतर मात्र केंद्रांवर मतदारांचा गर्दी दिसून आली. निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सकाळी ७:३० ते ११:३० या चार तासांमध्ये २०.९६ टक्के मतदान झाले. १२५४५  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

हिंगोलीमध्ये दोन जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ११:३० वाजेपर्यंतचे आकडेवारी उपलब्ध झाली असून त्यात १४.४३ टक्के मतदान झाले. शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या केंद्रावरील मतदान यंत्र बंद पडल्याने साधारणता अर्धा तास या ठिकाणी मतदान प्रक्रिया थांबली होती. उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी मतदान केंद्राला भेट दिली. मतदान यंत्र बदलल्यानंतर येथील मतदान सुरळीत सुरू झाले. हिंगोलीतही मतदानावर थंडीचा परिणाम जाणवला.

तापमान ११ अंशावर हिंगोलीत शनिवारी सकाळपासून वातावरणामध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. ११ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात घट झाल्याने सकाळच्या सुमारास मतदारांनी घराबाहेर पडण्याची टाळले. हिंगोली शहरातील दोन जागांसाठी मतदान होत आहे. एकूण १० मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया सुरू आहे. सकाळी साडेअकरा वाजेनंतर हिंगोली शहरातही केंद्रांवर रांगा पहावयास मिळाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Hingoli: Cold Impacts Voting; Low Turnout in First Four Hours

Web Summary : Hingoli district saw low voter turnout due to cold weather. Vasmat recorded 21% and Hingoli 14% in the initial four hours. Voting slowed in the morning but picked up later. A polling machine malfunctioned briefly in Hingoli.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Hingoliहिंगोली