शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

हिंगोली कृषी विभागामार्फत सूक्ष्म सिंचनावर ११.५ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:55 IST

कृषी विभागामार्फत विविध योजनांतर्गत सूक्ष्म सिंचनाचा ६४३७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून यामुळे ४३५२ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात ११.५५ कोटी रुपयांचे अनुदान शेतक-यांना अदा करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कृषी विभागामार्फत विविध योजनांतर्गत सूक्ष्म सिंचनाचा ६४३७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला असून यामुळे ४३५२ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यात ११.५५ कोटी रुपयांचे अनुदान शेतक-यांना अदा करण्यात आले आहे.मार्चअखेर कृषी विभागाने ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकºयांच्या अदा केलेल्या अनुदानाचा आकडा ११.५५ कोटींवर गेला आहे. विविध योजनांमध्ये १२ हजार ३९६ अर्ज शेतकºयांनी केले होते. यापैकी १३१0 अर्ज फेटाळले होते. तर स्थळ पाहणीत ८६ फेटाळले. तर ठिबक अथवा तुषार संच खरेदीची देयके सादर न केल्याने २३७९ लाभार्थ्यांना वगळण्यात आले होते.या योजनेत एकूण ८६२१ जणांचे अर्ज प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ८५६१ अर्जांना तत्वत: मंजुरी दिली होती. यापैकी ७७१६ अर्जांसोबतच योग्य बिले सादर झाल्याचे आढळून आले. त्यातही ६१ विविध त्रुटीमध्ये बाजूला पडले. तर तालुकानिहाय अनुदान मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची संख्या औंढा नागनाथ १११७, वसमत-१४0२, हिंगोली-१२१0, कळमनुरी-१५७४, सेनगाव ११६0 अशी आहे. या सर्व लाभार्थ्यांचे अनुदानही वितरित करण्यात आलेले आहे.या ६४३७ लाभार्थ्यांपैकी ठिबक सिंचनचे १८८५ तर तुषार सिंचन संचाचे ४५५२ लाभार्थी आहेत.असा झाला खर्च : तालुकानिहाय चित्रठिबक सिंचनवर तालुकानिहाय झालेला खर्च औंढा-६५.२८ लाख, वसमत-२९९.४२ लाख, हिंगोली-४५.८, कळमनुरी-१९२.४८, सेनगाव-२२.0३ लाख असा आहे. तर तुषार सिंचन संचावर औंढा-१0८.२७ लाख, वसमत-५७.१८, हिंगोली-१२२.७, कळमनुरी-११४.४२, सेनगाव-१२७.४२ लाख आहे. यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या २२१७ असून ३.६९ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मराठवाडा विकासमध्ये १८२४ जणांना लाभ दिला असून ३.५२ कोटींचा खर्च आहे. यात ठिबकचे ६२४ तर तुषारचे ११७0 लाभार्थी आहेत.खर्चास विलंबया योजनेत आॅनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेपासून तर सर्वच बाबींमध्ये विलंबाने कारवाई होते, अशी शेतकºयांत कायम ओरड असते. यासाठी वेळापत्रक जाहीर केल्यास दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी