लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील १४ उपकेंद्रावरून ७ जानेवारी रोजी पोलीस पाटील पदाची परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी ३ हजार २१५ जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी ३०१० उमेदवारांनी परीक्षा दिली तर २०५ परीक्षेस गैरहजर राहिले.परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. परीक्षे दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून दखल घेण्यात आली. खुराणा सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय केंद्रावरून १५४ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर पोदार इंग्लिश स्कु ल केंद्र १३४, संतश्रेष्ठ नामेदव पठाडे महाविद्यालय केंद्र १४८, आदर्श महाविद्यालय भाग अ ३४०, आदर्श महाविद्यालय भाग ब ३३९, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कुल २२६, शांताबाई मुंजाजी दराडे २२१, खाकीबाबा मेमोरीयल इंग्लिश स्कुल १८२, सरजुदेवी भिकुलाल भारूका कन्या विद्यालय २५१, जि. प. बहुविध प्रशाला २३१, जि. प. कन्याशाळा १५२, शिवाजी महाविद्यालय २३१, शासकीय तंत्र निकेतन २२८, माणिक स्मारक विद्यालय १७३ एकूण ३०१० जणांनी परीक्षा दिली. तर २०५ परीक्षेस गैरहजर राहिले. केंद्रावर परीक्षार्थींची एकच गर्दी झाली होती.
हिंगोलीत ३०१० उमेदवारांनी दिली पोलीस पाटीलची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:27 IST