शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

उमेदवारीबाबत अनिश्चितता, हेमंत पाटील समर्थक पुन्हा सक्रिय, ताफा मुंबईकडे रवाना

By विजय पाटील | Updated: April 2, 2024 19:18 IST

उमेदवारी दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत

हिंगोली : लोकसभेमध्ये महायुतीत सुरू असलेला संगीत खुर्चीचा खेळ उमेदवारी दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस उरले असतानाही संपायला तयार नाही. भविष्यात होणारे नुकसान लक्षात घेता भाजपची मंडळी बॅकफूटवर गेल्याने खा. हेमंत पाटील यांच्या समर्थकांनी उचल खाल्ली आहे. पाटील यांनाच उमेदवारीच्या मागणीसाठी मुंबईकडे ते रवाना झाले आहेत.

हिंगोली लोकसभेची उमेदवारी शिंदे गटाचे खा. हेमंत पाटील यांना जाहीर झाल्यानंतर भाजपच्या मंडळीने बैठका घेवून त्यांची डोकेदुखी वाढविली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी केलेले आकांडतांडव पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचले. त्यानंतर शिंदे गटाकडून उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र भाजपच्या तालावर नाचायचे किती व कुठे कुठे? अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. नांदेडातही त्याचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. इतर लोकसभा मतदारसंघांमध्ये तसेच आगामी विधानसभेत भाजपला शिंदे गटाची मदत लागणार नाही का? असा सवाल केला जात आहे. शिंदे गटाकडून पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चेनंतर आज पुन्हा वेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. तर भाजपच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाद दिली नसल्याने पाटील समर्थकही जागे झाले आहेत. 

झुकेगा नही...मित्रपक्षांना भाजपने आतापर्यंत संपविण्याचेच काम केले. हिंगोलीतही तसेच करण्याचा डाव आहे. त्यामुळे उमेदवारी बदलून भाजपपुढे झुकण्याची भूमिका घेण्यास शिवसेनेचे कार्यकर्ते तयार नाहीत. उमेदवाराबद्दल नाराजी नसताना ती पसरवण्याचे षडयंत्र भाजपच्या मंडळीनेच उमेदवारीच्या स्वार्थापोटी केल्याचे शिवसैनिकांचे म्हणने आहे. त्यामुळे हा डाव उधळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. भाजपसमोर कोणत्याही परिस्थिती झुकायचे नाही, अशी शिवसैनिकांची भूमिका आहे.

टॅग्स :Hemant Patilहेमंत पाटीलHingoliहिंगोलीShiv Senaशिवसेना