शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत जोरदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:11 IST

जिल्हभरात २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण होते. तर कोठे रिमझीम पाऊस होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हभरात २० सप्टेंबर रोजी ढगाळ वातावरण होते. तर कोठे रिमझीम पाऊस होता. रात्री ९ वाजेच्या सुमारास हिंगोली शहरासह जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली.परतीच्या पावसाने तारलेकौठा : वसमत तालुक्यातील कौठा व परिसरात याहीवर्षी पावसाच्या लहरीपणाने खरीपाच्या हंगामाची सुरवात संकटाने झाली. त्यात पुन्हा पाऊस गायब झाल्याने परिस्थिती दुष्काळसदृश्य झाल्याने पिण्याच्या पाण्याचीही मारामार सुरू होती. परंतु परतीच्या पावसाने मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे. १९ आणि २० सप्टेंबरच्या रात्री दमदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होतआहे.कौठा परिसरात पाऊस रीमझिमच होता. दमदार पावसाची प्रतिक्षा होती. २० सप्टेंबर रोजी दमदार पाऊस झाल्याने आसना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून ओढे व नाल्यांनाही पहिल्यांदाच पाणी आले आहे. सोयाबीन, कापूस, हळद आदी पिकांना या पावसाने पुन्हा नवी संजीवनी मिळाली असून पाणी पातळीत ही वाढ होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.वसमत परिसरात पाऊसवसमत : तालुकाभरासह वसमत परिसरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात प्रसन्नतेचे वातावरण झाले असून शुक्रवारी देखील दिवसभराच्या विश्रांतीनंतर मध्यम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस शेतीतील सर्व पिकांसाठी आणि जलसाठ्यासह भूजल पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने जमिनीची पूर्ण तहान भागवून शेतातील पिकातून पाणी वाहत असल्याने नदी-नाल्यांना देखील पाणी वाहू लागले आहे.पिके बहरलीकळमनुरी : मागील दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे पीके बहरली असून जलस्त्रोतांना बºयापैकी पाणी आले आहे. १९ व २० सप्टेंबर या दोन दिवसात दमदार पाऊस पडल्याने या पावसामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर ही पीके बहरली आहेत.कळमनुरी तालुक्यातील काही भागात मूग तोडणीचे काम सुरू आहे. या पावसामुळे नाले, विहीरी, हातपंपांना पाणी आले आहे. एकुणच जलस्तर वाढलेला आहे. तालुक्यात सगळीकडे दमदार पाऊस पडत आहे. आतापर्यंत तालुक्यात सगळीकडे दमदार पाऊस पडत आहे. ४९३.८ टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे इसापूर धरणाची पाणीपातळी वाढत चालली आहे. या पाण्यामुळे शेतकरीही सुखावला आहेकनेरगावातही पाऊसकनेरगाव नाका : येथे २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ढगाळ वातावरण व विजेच्या लखलखाटात रिमझीम पावसाला सुरवात झाली असून पाऊस जास्त जोरात पडण्याची शक्यता दिसत आहे. थंड वारे सुटले आहे. त्यात पावसाची रीपरीप सुरू आहे.तलाव ओसंडलाऔंढा नागनाथ : येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे काठावर असलेल्या औंढा नागनाथ तलाव हा ओसंडून वाहत आहे. या तलावाच्या सांडव्यातून आता पाणी ओवर फुल होऊन वाहत आहे.दिवसभर उघडल्यानंतर रात्री सातच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्र भर पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसNatureनिसर्ग