शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हिवरखेडा भागात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 00:27 IST

तालुक्यातील हिवरखेडा, बोरखेडी या गावातील ऐन हिवाळ्यातच जलस्तर खालावल्याने ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नळ योजनेच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. तालुक्यात डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील हिवरखेडा, बोरखेडी या गावातील ऐन हिवाळ्यातच जलस्तर खालावल्याने ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नळ योजनेच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. तालुक्यात डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत.यावर्षी सरासरीच्या तुलनेत साखरा मंडळात ६१ टक्के पाऊस झाल्यामुळे या भागातील भूजल पाणीपातळी घटली आहे. पावसाळ्यात नदी नाले ओढयांना पाणीच आले नाही. परिणामी पाणी पातळीतही वाढ झाली नाही. सुरेगाव ग्रामीण भागातील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. हिवरखेडा, बोरखेडी येथील नळ योजना विविध कारणांमुळे बंदच आहेत. पाण्याची टाकीही शोभेची वस्तू बनली आहे. सध्या ग्रामपंचायतकडून गावातील एकाच विहिरीत पाईपलाईनने पाणी सोडले जात आहे. तर गावातील एक विहीर कोरडी पडली आहे.जलस्वराज विहिरीवरुन गावात पाणी पुरवठा होतो. मात्र या भागातील वीज पुरवठा सुरळीत राहत नसल्याने गावातील नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहे. हिवरखेडा येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बारा महिनेही शेतातुन पाणी आणावे लागते. गावातील हातपंप गेल्या अनेक पासून बंदच आहेत.याकडे लक्ष ग्रामपंचायतीने देऊन हातपंप दूरूस्त करण्याची मागणी आहे. गावातील दोन्ही विहिरीत पाणी सोडावे जेणेकरून करून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. बोरखेडी येथील नळ योजना अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. याकडे बोरखेडी येथील ग्रामपंचायतने लक्ष देऊन येथील पाणी पुरवठा सुरळीत करावा.याठिकाणी ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. असे असताना प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांत पाणी टंचाई गंभीर होण्याआधी उपाय योजना करणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली