शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

‘आयुष्यमान’चे आरोग्य कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:14 AM

गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गोरगरिबांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा रूग्णालय व आरोग्य विभागातर्फे धडपड केली जात आहे. २३ सप्टेंबर रोजी योजनेचा शुभारंभ झाला असून आतापर्यंत जिल्ह्यातील १२७ जणांना ई- कार्डवाटप करण्यात आले आहेत.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे उद्घाटन २३ सप्टेंबर रोजी देशभरात झाले. योजने अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील १ लाख ७ हजार २८ जणांना आरोग्य सेवेचा मोफत लाभ मिळणार आहे. यात ग्रामीण भागातील ९३ हजार ५७९ तर शहरी भागातील १३ हजार ४४९ लाभार्थ्यांचा यात समावेश आहे. विविध आजारांवर मोफत उपचार घेता येणार आहेत. कुटुंबातील पाच व्यक्तींपर्यंत हा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ एक वषार्साठी असून योजनेतंर्गत गरीब रुग्णांना मोठ्या खाजगी दवाखान्यात उपचार घेणे शक्य झाले आहे. संबधित रूग्णांना सांकेतांक क्रमांकदिला जाणार आहे. तो क्रमांक सांगितल्यावर सदर लाभार्थ्यास भारतात कोठेही लाभ घेणे शक्य आहे. सदर क्रमांक सांगितल्यानंतर उपचार अथवा शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार आहे. ही सेवा रूग्णालयात आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे.आयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाना देशात कोठेही लाभ घेता येणार आहे. सर्वांना सांकेतिक क्रमांक देण्यात येणार आहे. क्रमांक सांगितल्यानंतर आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत होणार आहे. योजनेतंर्गत वर्षातून एक वेळेस पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ वैद्यकीय उपचाराकरिता मिळणार आहे. या बरोबर कुटुंब प्रमुखास आयुष्यमान भारतचे कार्ड दिले जात आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रूग्णायात तसेच शहरातील स्नेहल नर्सींग होम व माधव हॉस्पीटल येथे सध्या नोंदणीचे काम सुरू असल्याचे डॉ. मोहसीन खान यांनी ‘लोकमत’ शी सांगितले.हिंगोली : भारतात कुठेही उपचार घेणे शक्यआयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाला भारतात कोठेही या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे. जिल्हा रूग्णालय, आरोग्य विभाग व आशावर्कर यांच्यामार्फत योजनेच्या जनजागृतीसाठी परिश्रम घेतले जात आहेत. शिवाय जिल्ह्यातील गावो-गावी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते.सन २०११ मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार कुटुंबांची निवड आयुष्मान जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यात आली आहे. योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ७ हजार २८ कुटुंबाना लाभ मिळणार.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची कामे सुरू असून लाभार्थ्यांची माहिती व कार्ड वाटप केली जात आहेत. अशी माहिती जि. शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य