शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांच्या दिवाळीतच पालावरच्यांना आनंद; फाटक्या कापडांवरच बच्चे कंपनीचा निरागस उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 17:47 IST

काही ठिकाणी सामाजिक दातृत्वाचा अनुभव येतो मात्र येथे तसे काही घडले नाही. त्यामुळे जे मिळेल तेच गोड मानून आनंद लुटला.

ठळक मुद्देगावाकडे शेतीवाडी नसलेल्या या आदिवासी भटक्यांना फिरून माल विकण्याशिवाय पर्याय नाही.

हिंगोली : आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात व्यवसायही चांगला झाला नसल्याने यामुळे यंदा भटक्या विक्रेत्यांकडे दिवाळी साजरी करण्यासाठी पुरेशी रक्कम नसल्याने बिकट अवस्थेतच हा सण साजरा करावा लागला. यंदा कोणी मदतीचा हातही पुढे केला नसल्याचे दिसून आले.

हिंगोली येथील अकोला बायपास भागात मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून आलेल्या विक्रेत्यांनी मागील आठ ते दहा दिवसांपासून बस्तान मांडले आहे. जवळपास दहा ते पंधरा झोपड्यांमध्ये या मंडळींनी संसार थाटला आहे. दिवाळी त्यांनी येथेच साजरी केली. मात्र यावर्षी चांगला व्यवसाय झाला नसल्याने दिवे लावून साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करावी लागली. मुलाबाळांना चांगले कपडेही घेता आले नाहीत. यंदा दोन ट्रक माल आणला असताना अर्धाही विक्री झाला नाही. त्यामुळे आर्थिक चणचण सोसावी लागली. काही ठिकाणी सामाजिक दातृत्वाचा अनुभव येतो मात्र येथे तसे काही घडले नाही. त्यामुळे जे मिळेल तेच गोड मानून आनंद लुटला.

दिवाळी काय खरेदी केले?मुलांनी आग्रह केल्यामुळे थोड्याबहुत प्रमाणात फटाके आणून फोडले. त्यावरच दिवाळीच्या सणाचा आनंद लुटला मिळालेल्या पैशातून गोड-धोड केले. मात्र आणलेला मालविक्री न झाल्याने अंगावर कर्ज असल्याने त्याची गोडी अनुभवता आली नाही. 

मुलांनी कसा लुटला आनंदया झोपडीमधील लहान मुलांनी सांगितले की, दुसऱ्यांनी फोडलेल्या फटाक्यांवर आम्ही समाधान मानले. आकाशात होणारी आतषबाजीचे रोषणाई हीच आमची दिवाळी होती. तसे काही फटाके पालकांनी आणून दिले होते. त्यावरच समाधान मानले.

कोरोनामुळे काही कायम परिणाम झाला याबाबत शंकर टाकिया म्हणाले की, आम्ही दरवर्षी महाराष्ट्रात विविध भागात असे साहित्य विक्रीला आणत असतो. मात्र यंदा या साहित्याला ग्राहक मिळत नाही. साडी अथवा जुन्या कापडावरही आम्ही प्लास्टिक भांडी विकतो. रोख रक्कम असल्यास पन्नास रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंत किंमत आहे. पुढील काळात चांगला व्यवसाय होईल. असे वाटते . 

दरवर्षीच असते भटकंतीदिवाळीच्या सणासाठी साधारणपणे सगळे गावाकडे जाण्यासाठी आग्रही असतात. मात्र गावाकडे शेतीवाडी नसलेल्या या आदिवासी भटक्यांना फिरून माल विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मुलांना प्रत्येक वर्षी नव्या ठिकाणी जावून व्यवसाय करीत दिवाळी साजरी करावी लागते. त्यात व्यवसाय चांगला झाला तर कपडेलत्ते व फटाके मिळतात. अन्यथा तसेच दिवस काढावे लागतात.

टॅग्स :HingoliहिंगोलीDiwaliदिवाळी