लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील बळसोंड परिसरात मागील काही दिवसांपासून सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. याकडे मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याचे साफ दुर्लक्ष होत असल्याने गुटखा विक्रेत्यांना भय उरले नाही.परिसरात सर्रास सुरु असलेल्या गुटखा विक्री मुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. या भागात कारवाईच होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, अगदी बिनधास्तपणे गुटखा विक्री होत आहे. विशेष म्हणजे सहज कुठेही गुटखा उपलब्ध होत आहे. गुटखा विक्रेत्यांची चांदीच होत आहे. तर कारवाई होऊन कमालीची गोपनीयता पाळली जात आहे.
गुटखा विक्री जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:14 IST