शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोठारी प्रकरणी ग्रामसेवक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:21 IST

समत तालुक्यातील कोठारी येथील १४ वित्त आयोगाच्या निधी वापरात झालेली अनियमीतता झाल्याचे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून गाजत होते. अखेर या प्रकरणी ग्रामसेवक व्ही.एम. गोरे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली तर सरपंचाच्या विरोधात कार्यवाहीसाठी प्रस्ताव आयुक्ताकडे प्रस्तावीत करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत तालुक्यातील कोठारी येथील १४ वित्त आयोगाच्या निधी वापरात झालेली अनियमीतता झाल्याचे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून गाजत होते. अखेर या प्रकरणी ग्रामसेवक व्ही.एम. गोरे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली तर सरपंचाच्या विरोधात कार्यवाहीसाठी प्रस्ताव आयुक्ताकडे प्रस्तावीत करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी दिली आहे.कोठारी येथे १४ वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या कामात अनियमितताचा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आला होता. याशिवाय क्रीडांगण योजनेतून मैदान तयार करण्याच्या कामाचा पत्ता नसल्याचा आरोप झाल्याने याचीही मोठी चर्चा झाली होती. क्रीडांगण मैदानाचे मूल्यमापन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांमार्फत होणार असून त्यानंतर या प्रकरणी कार्यवाहीचा मार्ग मोकळा होणार आहे.खडकाळ मैदानालाच क्रीडांगण म्हणून दाखविल्याने हे प्रकरण अनेकाच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागल्याने या प्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ स्तरावरून आतापर्यंत चालढकल झाल्याची तक्रार ग्रामस्थांची आहे.कोठारवाडीच्या क्रीडांगण प्रकरणावरून तालुक्यात इतर ठिकाणी झालेल्या क्रीडांगण उभारणीच्या कामाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. क्रिडांगण उभारणीच्या प्रकरणी अद्याप सखोल चौकशीकडे दुर्लक्ष कायम असल्याचे दिसते.१४ वित्त आयोग निधी वापरात व क्रीडांगण उभारणी प्रकरणी अनियमितता झाल्याने ग्रामस्थांनी पं.स. समोर उपोषण केले होते. कार्यवाहीच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. १४ वित्त आयोगाच्या निधी वापरात अनियमितता झाल्याच्या प्रकरणी पं.स.ला दोषरोपपत्र पाठविण्याचा आदेश जि.प. विभागाने दिला होता. त्यानंतर या प्रकरणी दोषारोप पाठविण्यात आले.१४ व्या वित्त आयोगातून होणाऱ्या कामात अनियमितता झाल्याप्रकरणी ग्रामसेवक व्ही.एम. गोरे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही काही दिवसांपूर्वी झालेली आहे. याच प्रकरणी सरपंचाविरूद्ध कार्यवाहीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविलेला आहे. या प्रकरणाकडे ग्रामस्थांसह तालुक्याचे लक्ष लागलेले होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsuspensionनिलंबन