शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

औंढा तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

औंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी गुरुवारी येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यात यापूर्वी रद्द ...

औंढा नागनाथ : तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी गुरुवारी येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यात यापूर्वी रद्द झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये काहीअंशी फेरबदल झाला तर काही ठिकाणी तेच आरक्षण कायम राहिले आहे. येहळेगाव (सोळंके) येथील सरपंचपदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे. परंतु या ठिकाणी एकही उमेदवार नसल्याने त्या ठिकाणाचे सरपंचपद रिक्त राहणार आहे. त्याऐवजी उपसरपंच कारभार पाहणार असल्याचे दिसत आहे.

अनुसूचित जाती - काठोडा, ढेगज, चोंडीतर्फे शहापूर, सिद्धेश्वर, आजरसोंडा, अंजनवाडा.

अनुसूचित जाती महिला- उंडेगाव, दुरचूना, मार्डी, नागझरी, वडद, बोरजा, रामेश्वर.

अनुसूचित जमाती - लोहरा बुद्रुक, रूपूर, जडगाव, देवाळातर्फे लाख, पोटा बुद्रुक, जामगव्हाण, पुरजळ, असोलातर्फे औंढा, जोड पिंपरी.

अनुसूचित जमाती महिला- सावळी बहिणाराव, माथा, नालेगाव, येळेगाव सोळंके, पेरजाबाद, उमरा, काकडदाभा, चिमेगाव.

नागरिकांचा मागास प्रवर्ग- रांजाळा, अंजनवाडी, येडुद, साळणा, मेथा, मूर्तिजापूर, सावंगी, शिरड शहापूर, वाळकी, सुरवाडी, नागेशवाडी, सुरेगाव, आमदरी, सारंगवाडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- हिवरा जाटू, गोजेगाव, कंजारा, सेंदुरसना, कोंडसी बुद्रुक, कुंडकर पिंपरी, गोळेगाव, जवळा बाजार, चिंचोली निळोबा, नांदखेडा, भोसी, फुलदाभा, सोनवाडी, संघानाईक तांडा.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी- लांडाळा, पूर, दौडगाव, सावळी खुर्द, पोटा खुर्द, वसई, देवाळा तुर्क, जलालदाभा, दुधाळा, राजापूर, नंदगाव, पिंपळदरीतर्फे नांदापूर, हिवरखेडा, टाकळगव्हाणतर्फे औंढा, येळी, राजदरी, निशाणा, ब्राह्मणवाडा, सुकापूर, लोहारा खुर्द, गढाळा, आणि वगरवाडी तांडा.

सर्वसाधारण प्रवर्ग महिला- बेरुळा, वडचुना, उखळी, केळी, तपोवन, शिरला, पारडी सावळी, असोलातर्फे लाख, जलालपूर, असोदा, लाख, धार, पांगरातर्फे लाख, अनखळी, पिंपळा, वगरवाडी, काठोडा तांडा, गांगलवाडी, सावरखेडा, दरेगाव, तामटी तांडा, लक्ष्मण नाईक तांडा आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

सदरील आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले, नायब तहसीलदार सचिन जोशी, वैजनाथ भालेराव, शैलेश वाईकर आदींची उपस्थिती तर यशस्वीतेसाठी उमाकांत मुळे, हनुमान शेळके यांनी परिश्रम घेतले. आरक्षण सोडत ऐकण्यासाठी नूतन ग्रामपंचायत सदस्य, पॅनलप्रमुख व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सोनवाडी ही ग्रामपंचायत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाली, तर सारंगवाडी येथेही सदरील आरक्षणाचा एकही उमेदवार नसल्याने शासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.