शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी मुटकुळेंचे राज्यपालांकडे गा-हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:32 IST

जिल्ह्यातील सिंचन अनुशेष राज्यपालांनी मान्य केला आहे. सदर अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर व अन्य ठिकाणी सिंचन प्रकल्प घेण्याबाबत आराखडासुद्धा मंजूर करण्यात आला आहे; परंतु सदर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडसर येत आहे. तो दूर व्हावा, यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील सिंचन अनुशेष राज्यपालांनी मान्य केला आहे. सदर अनुशेष दूर करण्यासाठी कयाधू नदीवर व अन्य ठिकाणी सिंचन प्रकल्प घेण्याबाबत आराखडासुद्धा मंजूर करण्यात आला आहे; परंतु सदर सिंचन प्रकल्पासाठी आवश्यक पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडसर येत आहे. तो दूर व्हावा, यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शिष्टमंडळासह राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली.आवश्यक नसलेल्या प्रकल्पांसाठी यापूर्वी चुकीच्या पद्धतीने पाणी आरक्षित केल्यामुळे नवीन प्रकल्पासाठी पाणी उपलब्धता होण्यास अडचण येत आहे. या प्रकरणी आ.तानाजी मुटकुळे यांनी १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील राजभवनावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेवून चर्चा केली. हिंगोली जिल्हा भेटीचे आग्रहाचे निमंत्रण दिले. याप्रसंगी राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पासाठी तातडीने पाणी उपलब्धता प्रमाणपत्रे देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात येतील व लवकरात लवकर कामे सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यानुसार ५ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ११ वाजता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रसंगी माजी आ. गजाननराव घुगे, इंजि. पी.आर.देशमुख, उत्तमराव जगताप, श्रीरंग राठोड, रवी देवकर आदींची उपस्थिती होती.गेल्या अनेक दिवसांपासून आ.तान्हाजी मुटकुळे यांचा सिंचन अनुशेषासाठी पाठपुरावा सुरू होता. एक प्रश्न मार्गी लागला तर दुसरा निर्माण होत असल्याने ही कामे मार्गी लागण्यात अडचणी येत असून आता पाणी उपलब्धतेचा नवा लढा देण्याची वेळ आली आहे.