शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा आरोग्यदायी निर्णय; राज्यातील १० गावे ‘मधाची गावे’ म्हणून ओळखली जाणार

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: May 5, 2025 18:17 IST

खेडेगावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असल्यामुळे ग्रामीण भाग हे व्यापाराचे केंद्र होण्यास तसेच ग्रामीण भागातील रोजगार वाढीस फार मोठी मदत मिळणार आहे.

हिंगोली : महाराष्ट्रातील विविध १० जिल्ह्यांतील १० गावांमध्ये ‘मधाचे गाव’ ही योजना राबविण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ३० एप्रिल २०२५ रोजी घेतला आहे. सदर योजनेद्वारे राज्यात नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेल्या विविध भागांमध्ये मधमाशांच्या संवर्धनातून तसेच मध आणि मधमाशांपासून तयार होणारी उत्पादनाची साखळी, प्रक्रिया व विक्री व्यवस्था करण्यात येईल.

या माध्यमातून राज्यात एक प्रकारे मधूपर्यटन होणार आहे. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने या योजनेसाठी राज्यातील दहा गावांच्या नावांचा प्रस्ताव राज्य शासनास सादर केला होता. या योजनेसाठी राज्य शासनाने ५ कोटी, १ लाख ९७ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे. ज्या गावामध्ये ही योजना यावर्षी राबविण्यात येणार आहे. त्याच गावात सदर योजना पुढच्या वर्षीही राबविण्यात येईल, असे हमीपत्र शासनाकडे सादर करणे हे संबंधित ग्रामपंचायतीला आवश्यक असेल.

योजनेत समाविष्ट गावाच्या नावांची यादी बघून हे लक्षात येते की, गावांची निवड करताना संपूर्णपणे प्रादेशिक समतोल राखण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश अशा पाचही भागांतील गावे या यादीमध्ये आहेत. खेडेगावांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असल्यामुळे ग्रामीण भाग हे व्यापाराचे केंद्र होण्यास तसेच ग्रामीण भागातील रोजगार वाढीस फार मोठी मदत मिळणार आहे.

कोणत्या गावात असेल ही योजना?‘मधाचे गाव’ ही योजना घोलवड (ता. डहाणू, जि. पालघर), भंडारवाडी (ता. किनवट, जि. नांदेड), बोरझर (ता. नवापूर, जि. नंदुरबार), काकडधाबा (ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली), चाकोरे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), उडदावणे (ता. अकोले, जि. अहिल्यानगर), शेलमोहा (ता. गंगाखेड, जि. परभणी), सिंधीविहीर (ता. कारंजा, जि. वर्धा), सालोशी (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) आणि आमझरी (ता. अमरावती, जि. अमरावती) या दहा गावांमध्ये राबविण्यात येणार आहे.

शासनाचा आरोग्यदायी निर्णयशासनाचा निर्णय अत्यंत योग्य असा आहे. ज्या भागात दाट जंगल आहे, अशा भागात मधाची गावे शासनाने निवडली आहेत. मध हा आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त असून , मधाचे अनेक फायदे आहेत. तसेच मध नैसर्गिक गोड पदार्थ असून, ज्यामध्ये अनेक पोषक तत्वे आहेत. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असून, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. दिवसेंदिवस वातावरणात बदल होऊ लागला आहे. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी 'मधाची गावे' निवडण्याचा निर्णय घेतला असावा.- डॉ. गजानन धाडवे, आयुर्वेदिकतज्ज्ञ, हिंगोली

मंजूर करण्यात आलेला निधी (रुपये लाखामध्ये)घोलवड- ५४, भंडारवाडी- ५३, बोरझर- ४८, काकडदाभा- ४९, चाकोरे- ४०.२२, उडदावणे- ४६.७५, शेलमोहा- ५४, सिंधीविहीर - ५४, सालोशी- ४९, आमझरी-५४

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोलीFarmerशेतकरी