शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शासन हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:28 IST

पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव देश बचाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पंतप्रधान हे अन्याय अत्याचार, घोटाळे व देशात होणारा भ्रष्टाचार याबाबतीत काहीच बोलत नाहीत. शिवाय शासनाने आता हुकूमशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली असून पंतप्रधान केवळ भाजपाचा प्रसार अधिक कसा होईल या विषयावर जास्त बोलतात. त्यामुळे संविधान बचाव देश बचाव मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्षा फौजिया खान यांनी रविवारी दिली.यावेळी आ. रामराव वडकुते, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुनीर पटेल, जावेदराज आदी उपस्थित होते.पुढे बोलतान फौजिया खान म्हणाल्या, सगळीकडे ईव्हीएम मशिनचा विरोध केला जात आहे. इतर देशांनीही ईव्हीएम मशिन सोडली आहे. मग भारतातच ईव्हीएम मशिनचा हट्ट का? आम्हाला विश्वास नाही, या मशिनवर; म्हणून या मशिनची दहन मोहीम राबविली जात आहे. बोफोर्सपेक्षाही मोठा घोटाळा एआ आहे, त्यामुळे त्याची किंमत स्ष्टपणे देशासमोर मांडावी, भाजपाकडे अफाट पैसा आला कोठून याची चौकशी होणे गरजेचे आहे, कोट्यवधी रूपये खर्च करून टोलेजंग भाजपाचे कार्यालय आज उभे राहत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून धर्मा-धर्मांत भांडण लावणे हे एक षडयंत्र या सरकारकडून रचले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतभेद पसरविले जात असून हे देशाला घातक आहे. देशात ५०० पेक्षा जास्त लोकांना रस्त्यावर मारण्यात आले आहे. हा गंभीर विषय असल्याचे फौजिया खान यांनी सांगितले. तसेच महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले असून आजही महिला असुरक्षित आहेत, परंतु सराकार महिलांवरील वाढत्या अत्याचाराकडे याकडे दुर्लक्ष करीत आहे. देशातील वाढता अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारामुळे देशात अराजकता पसरत असल्याचा आरोप फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस