शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

हे सरकार संविधानाला मोडीत काढायला निघालय-आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:48 IST

भाजप-सेना युतीने संविधान मोडीत काढायची प्रतिज्ञा केली आहे. हे शासन मोहन भागवत चालवतात. तशी आपण सर्वांनी या सरकारला मोडीत काढण्याची प्रतिज्ञा करु, असे आवाहन अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील रामलिला मैदानावर केले.

ठळक मुद्देहे शासन मोहन भागवत चालवतात

हिंगोली : भाजप-सेना युतीने संविधान मोडीत काढायची प्रतिज्ञा केली आहे. हे शासन मोहन भागवत चालवतात. तशी आपण सर्वांनी या सरकारला मोडीत काढण्याची प्रतिज्ञा करु, असे आवाहन अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी येथील रामलिला मैदानावर केले.परभणी येथे होणाऱ्या जाहीर सभेत मराठवाड्यातील उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे उमेदवार जाहिर झाल्यावर एकही माघार घेणार नाही, असेही ते म्हणाले. १३ पाँईट रोस्टर काढून मागासवर्गीयांना लाभापासून वंचित ठेवण्याचा घाट सरकारने आखल्याचे ते यावेळी म्हणाले. शासन महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, शबरी महामंडळ या योजनांतून दिडशे ते दोनशे कोटी वंचित समाजाला देते. मात्र वंचित घटकांचा खरा हक्क दिड हजार कोटींचा आहे. हे युती सरकार शासनाच्या तिजोरीची लूट करत आहे. हे थांबवण्यासाठी वंचित घटकांना एकत्र येण्याची गरज आहे.वंचित घटकातील बेरोजगार तरुण बँकेत कर्ज घेण्यासाठी गेल्यावर बँक तारण मागते. या तरुणांकडे तारण वस्तू नसल्याने ते कर्जास मुकत आहेत. धर्माच्या नावाने निवडून आलेले या सरकारला अर्थशास्त्राच काडीच ज्ञान नाही. या मनुवादी सरकारचे धोरण श्रीमंताला आणखी श्रीमंत करायचे आणि गरीबाला आणखी गरीब करायचे आहे. मी या बिनडोक मुख्यमंत्र्याला सांगू इच्छीतो, जो वर्ग गरीब आहे अशा माणसाच्या हातात पैसा द्या, नौकºया द्या तो वर्ग अर्थव्यवस्था ढासळू देणार नाही. महाराष्टÑातील अनेक मंदिरांचे वार्षिक उत्पन्न दोन हजार कोटींच्या वर आहे. लातूर-उस्मानाबाद या जिल्ह्यात दुष्काळ आहे. येथील तुळजाभवानी मंदिराचे वार्षिक उत्पन्न साडेतीन हजार कोटींच्या वर आहे. हा पैसा दुष्काळ निवारणार्थ कामांसाठी वापरल्यास हे दोन्ही जिल्हे दोन वर्षांत दुष्काळमुक्त होतील, असेही ते म्हणाले.आरएसएसला संवैधानिक चौकटीत आणल्यास आघाडीआमचा लढा आरएसएसविरुद्ध आहे. ही गैरसंविधानिक संघटना देश, संविधान मानत नाही. तरीही प्रशासन चालवत आहे. ही संघटना संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा जे कुणी आम्हाला देईल, त्यांच्याशी आघाडी करण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले. हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे केंद्र शासन अविवेकी भूमिका घेत आहे. त्याचाच परिपाक म्हणून सध्या देशात काही घडामोडी घडत आहेत. प.बंगालच्या ममता बॅनर्जी व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच केंद्राच्या सीबीआयची परवानगी काढून घेतली. आता कलकत्त्याचा एपिसोड हे केंद्राचे निव्वळ नाटक आहे. कायदा व सुव्यवस्था ही राज्याची जबाबदारी आहे. जर राज्य ऐकत नसेल तर योग्य पुराव्यानिशी सर्वोच्च न्यायालयात जाता येते. संविधानाने एककल्ली व सर्वोच्च अधिकार कुणालाच दिले नाहीत. एकमेकांचे नियंत्रण ठेवले. त्यापैकीच सर्वोच्च न्यायालय आहे. मात्र सीबीआयला हत्यार बनविले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने बंदिस्त पोपट असे ताशेरे त्यावर ओढले आहेत. तर जाणीवपूर्वक राज्य आमचे ऐकत नसल्याचे वातावरण निर्माण केले जात असल्याचेही ते म्हणाले. यावेळी एमआयएमचे युसूफ पुंजानी, किशन चव्हाण, फेरोजलाला, जाधव, वसीम देशमुख, रवींद्र वाढे, ज्योतीपाल रणवीर, अ‍ॅड.रवी शिंदे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPoliticsराजकारण