शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला दुष्काळाची जाणीवच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:22 IST

हे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यात पटाईत आहे. राज्य दुष्काळाच्या खाईत असताना सरकार नावाची व्यवस्थाच कुठे दिसत नाही. दुर्दैवाने या सरकारला दुष्काळाची जाणीवच नसल्याने आम्ही ग्रामीण भागात वास्तव पाहणीसाठी फिरत असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडण्यात पटाईत आहे. राज्य दुष्काळाच्या खाईत असताना सरकार नावाची व्यवस्थाच कुठे दिसत नाही. दुर्दैवाने या सरकारला दुष्काळाची जाणीवच नसल्याने आम्ही ग्रामीण भागात वास्तव पाहणीसाठी फिरत असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, अ‍ॅड. बाबा नाईक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विखे पाटील यांनी पीक परिस्थिती व पीकविम्याबाबत माहिती घेतली. तेव्हा गतवर्षी उडीद, मूग, सोयाबीन, कापूस आदीचा विमा काढला. मात्र छदामही मिळाला नाही. यंदाही अतिशय वाईट परिस्थिती असताना दुष्काळच जाहीर झाला नसल्याचे सांगितले. आता जनावरांना चारा नाही. पूर्णपणे कोरडवाहू असलेल्या या जमिनीत काहीच येत नाही. हाताला कामही नाही, असेही काही शेतकºयांनी सांगितले.यानंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, दुष्काळ हाताळण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. कर्जमाफीही शेतकºयांपर्यंत पोहोचली नाही.कर्जमाफी तर आता व्याजासकट दिली पाहिजे. यंदाचा खरीप हंगाम गेल्याने ते कर्जही माफ व्हावे. तर शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५0 हजार रुपये अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. जुलै-आॅगस्टपासून दुष्काळी स्थिती आहे. मात्र शासन अजूनही दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर करण्यातच आहे. आणखी सात महिने दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. चारा, पाणी, ग्रामीण बेरोजगारांच्या हाताला काम हे महत्त्वाचे विषय केवळ जिल्हा कार्यालयात बसून घेतलेल्या बैठकांत सुटत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष गावात पाहणी करावी लागते, असेही ते म्हणाले....तर निलंगेकरांची प्रकरणे सभागृहात मांडू-विखेभाजपचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केल्याबाबत विचारल्यावर ते म्हणाले, दुर्दैवाने त्यांना दुष्काळाची जाणीव नाही. त्यांचे अपयश आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. निलंगेकरांच्या भ्रष्टाचाराचीच प्रकरणे एवढी आहेत की त्यावर सभागृहात आम्ही बोलूच. मात्र निदान शेतकºयांचा अपमान तरी करू नये, अशी आशा असल्याचेही विखे पाटील म्हणाले. १९ नोव्हेंबरपासून अधिवेशन सुरू होत आहे. त्यात शासनाने खोटी आकडेवारी सांगून पोपटपंची केल्यास या दौºयातील वास्तव चित्र त्यांच्यासमोर मांडता येईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस