शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठा समाजाकडून गोरेगाव कडकडीत बंद; नारायण राणेंच्या प्रतिमेला मारले जोडे 

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: February 15, 2024 14:02 IST

जरांगे पाटील यांच्या विषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज बांधवांकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चपला जोडे मारले

- दिलीप कावरखेगोरेगाव ((जि. हिंगोली ): येथे सकल मराठा समाजाच्या वतीने  १५ फेब्रुवारी रोजी  कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला  चपला - जोडे व दंडुक्याने चोप देत जाळून टाकीत निषेध नोंदविण्यात आला.

सगेसोयऱ्यांचा कायदा लागू करून मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. दरम्यान जरांगे यांची प्रकृती खालावत  असताना मराठा समाजामध्ये सरकारच्या दुर्लक्षित धोरणाबाबत असंतोष व्यक्त केला जात असून सर्वत्र आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. सदर आंदोलनाच्या समर्थनार्थ गोरेगाव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देत  १५ फेब्रुवारी रोजी बंद पुकारण्यात आला.या प्रसंगी दिवसभर बाजारपेठेत स्वयंस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला.  

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या विषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त फेसबुक पोस्ट प्रकरणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समाज बांधवांकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चपला जोडे व दंडुक्यांनी चोप देत, प्रतिमा दहन करून घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. यावेळी प्रदीप पाटील, बाबुराव कावरखे, सतीश कावरखे, गजानन कावरखे, पंजाब कावरखे, सुभाष अवचार, जी. एम. खिल्लारी, शिवाजी कावरखे, जगन कावरखे , माधव कावरखे, भगवान देशमुख आदी सह शेकडो मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.

ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ... गोरेगाव बंदच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्याकडून  सकाळपासून गावामध्ये पेट्रोलिंग सुरू करण्यात आली असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक मा जिजाऊ चौक येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMaratha Reservationमराठा आरक्षणNarayan Raneनारायण राणे