कळमनुरी : मालमत्ता कर भरण्यास सवलत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली आहे.
गत काही दिवसांपासून नगर परिषदेकडून मालमत्ता कराची सक्तीने वसुली केली जात आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. काही मालमत्ताधारकांनी ५० टक्के मालमत्ता कर भरण्यासठी त्यांना काही कालावधीसाठी सवलत देण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांकडे १९ मार्च रोजी देण्यात आले.
मागील एक वर्षापासून कोरोना महामारीमुळे अनेकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ मालमत्ता कर भरण्यासाठी पैसा नाही. काही शटरधारकांनी ५० टक्के मालमत्ता कर भरण्यास त्यांना काही कालावधीसाठी सवलत द्यावी. त्यांच्याकडून सक्तीची मालमत्ता कर वसुली करू नये, या मागणीचे निवेदनात दिले आहे. निवेदन कार्यालयीन अधीक्षक म. जाकेर यांना देण्यात आले. निवेदनावर अक्षय देशमुख, आशिष कस्तुरे, वैभव मुंढे, संदीप पतंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.