शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनी गाठली थेट जिल्हाकचेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:34 IST

शहरातील कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयात आवश्यक कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींनी थेट ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हाकचेरी गाठली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयात आवश्यक कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींनी थेट ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जिल्हाकचेरी गाठली.मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी व शाळेतील गळती कमी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. तर दुसरीकडे हिंगोली येथील कस्तूरबा गांधी विद्यालयातील मुलींना मात्र विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कस्तूरबा गांधी विद्यालयातील मुलींना वेळेत भोजन दिले जात नाही. दिले तर ते अर्धवट शिजलेले असते, विद्यालयात वेळेवर तासिका भरत नाहीत, शिवाय शाळेतील कामेही करावी लावली जात असल्याने या नेहमीच्या त्रासाला कंटाळून जवळपास ७० मुलीनीं थेट मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाकचेरीसमोर अचानक मुली एकत्र जमल्याची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील संबधित कर्मचारी हजर झाले होते. शिक्षणाधिकारी यांच्यापुढे विद्यालयातील समस्यांचा पाढाच विद्यार्थिनीनीं वाचून दाखविला. यावेळी काही विद्यार्थिनींना आश्रू अनावर झाले होते. संबधित विद्यालयाची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी विद्यार्थिनींना दिले. काही वेळानंतर विद्यालयातील शिक्षक व इतर कर्मचारी हजर झाले व विद्यार्थिनींना शाळेत घेऊन गेले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी मात्र मुलींची भेट होऊ शकली नाही.हिंगोली येथील कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयात पाचवी ते दहावीतील शंभरच्या जवळपास मुली निवासी शिक्षण घेत आहेत. विद्यालयातील निकृष्ठ भोजन, तासिका भरल्या जात नाहीत, मुलींना स्वयंपाक करायला लावणे त्यामुळे मुलींचे हाल होत आहेत. प्रशासन येथील मुलींच्या समस्यांकडे खरंच लक्ष देईल का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय चौकशीचे आवश्वासनही मुलींना शिक्षणाधिकाºयांनी दिले आहे.मुलींची गैरसोय : चौकशी केली जाईल...कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयातील असुविधेबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांना विचारले असता ते म्हणाले, संबधित शाळेची चौकशी केली जाईल. त्यानंतर नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल असे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक विद्यार्थिनीं जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून बसल्याने अनेकांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

टॅग्स :Studentविद्यार्थीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली