शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३0 जूनपर्यंत पीककर्ज वाटप उद्दिष्ट गाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:03 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला पाहिजे. बँकांनी ९५0 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गतीने काम पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला.भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी अग्रणी बँकेच्या वतीने आढावा सादर करण्यात आला. त्यात एकाही बँकेच्या कर्जवाटपाची स्थिती सुधारत नसल्याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात ऐन पेरणीच्या तोंडावर ९४0२ शेतकºयांना केवळ ४७.५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याने हे चांगले चित्र नसल्याचे सांगून त्यांनी बँक अधिकाºयांना कानपिचक्या दिल्या. यावेळी ज्या बँकांचे कर्जवाटप कमी आहे, अशांना मुद्दाम बोलावण्यात आले होते. तर जूनअखेर हे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. तर कर्जमाफी वाटप व कर्जमाफीतील सभासदांना नवीन कर्जवाटप याचा आढावाही भंडारी यांनी घेतला. त्यात ४७४५ जणांना १७.१३ कोटी रुपयांचे वाटप झाल्याचे सांगण्यात आले.पीककर्जाव्यतिरिक्त विविध योजनांत करायच्या वाटपाचा आकडाही समाधानकारक नसल्याचे आढाव्यात समोर आले. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतर या कर्जवाटपात गती येईल, अशी अपेक्षा आहे.मात्र एकूण ९ हजारांपैकी अर्ध्या शेतकºयांना जर कर्जमाफीनंतर कर्ज दिल्याचे बँका सांगत असतील तर नियमित खातेदारांची संख्याही मोठी आहे. त्यांना बँका नेहमीच प्राधान्य देतात. यावेळी अशा ग्राहकांनाही कर्ज दिले जात नसल्याचे चित्र यावरून दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी