शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजली जिल्हा कचेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:34 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. विविध प्रलंबित मागण्या, शेतीचे वाद, यासह अनेक समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषण केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कचेरी व इतर शासकीय कार्यालयापुढे मंडप टाकून उपोषण व आंदोलन सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला १४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उपोषणकर्त्यांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. विविध प्रलंबित मागण्या, शेतीचे वाद, यासह अनेक समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन उपोषण केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा कचेरी व इतर शासकीय कार्यालयापुढे मंडप टाकून उपोषण व आंदोलन सुरू आहेत.हिंगोली शहरातील विभागीय वन अधिकारी कार्यालयासमोर कळमनुरी तालुक्यातील शिवनी बु. येथील पंडित गंगाराम भालेराव हे कुटुंबियासमवेत उपोषणास बसले आहेत. पंडित यांचा वन विभागाने सागवान पासचा माल जप्त केला तो परत द्यावा, तसेच संबंधित वनरक्षकास निलंबित करून एका खाजगी इसमाविरूद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारपासून पंडित कुटुंबिय लेकराबाळांसह उपोषणास बसले आहेत.तसेच वसमत तालुक्यातील पळसगाव येथील सांभा नारायण डुकरे व नितीन टिकाराम सूर्यवंशी हे शाळेत हजर होऊनही संबंधित संस्थाचालक हजेरीपटावर सह्या करू देत नसल्यामुळे जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसले आहेत. शाळेवर आल्यास शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी कारवाई करा, अशीही संस्थाचालक धमकी देत असल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे जलसंधारण विभगामार्फत बांधण्यात आलेल्या पाच बंधाºयांपैकी तीन बंधाºयांच्या कामाची चौकशी करावी. रोही, रानडुकरे व वानरे वन्य जिवांमुळे शेतकºयांचे होणारे नुकसान टाळावे यासह विविध मागण्या शासनाला कळवूनही प्रशासनास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कॉ. बालासाहेब शेषराव शिंदे हे जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसले आहेत.सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील देवराव किसन भुरके अपंग असून विहिरीची सामायिक हिश्श्यामध्ये नोंद करण्याची त्यांची मागणी आहे. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ते उपोषणास बसले.हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथील गोदावरी शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषणास बसल्या आहेत. पोलिसांनी संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप कार्यवाही नाही. विरोधकांनी त्यांच्या हळद पिकाची नासधूस केली आहे.मोंढ्यातील महिला कामगारांचा प्रश्न बनला गंभीर४मागील ४० वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथील मोंढ्यात काम करणाºया महिलांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे महिला कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मोंढ्यात परत काम करण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी जवळपास ४५ महिलां गटा-गटाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच नागरी हक्क संरक्षण विभाग कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. समितीचे पदाधिकारीही आमच्या मागणीकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनीच यावर काही तोडगा काढून कामावर पूर्ववत करून घ्यावे, अशी मागणी महिला कामगारांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा