वसमत तालुक्यातील वसमत शहर व कुरुंदा येथे पुरवठा विभागाच्या वतीने गोदाम उभारण्यात यावे, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनाने याठिकाणी गोदाम बांधकामास मंजुरी दिली. तसेच कुरुंदा येथील गोदाम बांधकामास ३ कोटी ५८ लाख ३८ हजार रुपयांच्या तर वसमत येथील बांधकामासाठी ३ कोटी ६४ लाख ७० हजार रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेच्या आदेशानुसार अंदाजित खर्च मंजूर केला होता. त्यानुसार सध्या कुरुंदा येथील गोदामासाठी ३५ लाख ८३ हजार ८०० रुपये तर वसमत येथील बांधकामासाठी ३६ लाख ४७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी ३० सप्टेंबरअखेर खर्च करावा लागणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे या कामावर लक्ष असणार आहे.
गोदाम बांधकामासाठी ७२ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST