शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

हिंगोलीत मोफत सोनोग्राफी तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:53 IST

तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण भागातील सर्व गरोदर मातांची सोनोग्राफी तज्ज्ञातर्फे मोफत सोनोग्राफी करून मिळणार आहे. यावर होणारा खर्च रुग्ण कल्याण समिती करणार आहे. यामुळे गरोदर मातांची व बाळाची विशेष काळजी घेता येईल. तसेच ग्रामीण भागातील रूग्णांना याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामीण भागातील सर्व गरोदर मातांची सोनोग्राफी तज्ज्ञातर्फे मोफत सोनोग्राफी करून मिळणार आहे. यावर होणारा खर्च रुग्ण कल्याण समिती करणार आहे. यामुळे गरोदर मातांची व बाळाची विशेष काळजी घेता येईल. तसेच ग्रामीण भागातील रूग्णांना याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.हिंगोली तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.सतीश रूणवाल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे यांनी नियोजन करून खासगी सोनोग्राफी तज्ञ डॉ. पवार, डॉ. भरतीया, डॉ सो,टेहरे,डॉ. भाले यांनी सहकार्य करणार आहेत. सदर सुविधेसाठी प्रत्येक सोनोग्राफी बाबत तसा करार करून घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सदर मोफत तपासणी मोहिमेस ९ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.हिंगोली तालुक्यातून ४ प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ८४ गरोदर मातांना तपासणीसाठी पाठविल्याचे तालुका आरोग्याधिकारी रूणवाल यांनी सांगितले. प्रमाणे दर दमहिन्याला तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमामुळे गरीब रूग्णांना दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातून या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. तसेच यामुळे माता व बालमृत्युला आळा बसेल, शिवाय गरोदर माता व बालमृत्यू दर आटोक्यात आणण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील रूग्णांनी सदर सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.या उपक्रमा अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिबीर घेऊन गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्याच बरोबर गरोदर मातांना घ्यावयाची काळजी तसेच सकस आहारासंदर्भात माहित देण्यात आली. एवढेच काय तर गरोदर मातांची जिल्हा ठिकाणी जिल्हा सामान्य अथवा, खासगी रूग्णालयात मोफत सोनोग्राफीची सुविधा केली आहे. शिवाय सदरील महिलेस सोनोग्राफीसाठी आणल्यानंतर परत नेऊन सोडले जाणार आहे.