शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत सायकलचा निधी सोमवारी वर्ग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:06 IST

शाळेतील मुलींची गळती थांबावी व विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी शासनाकडून मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या व शाळेपासून ५ किमी अंतरावरील गरजू मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जातात. यावर्षी सायकलसाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी २६ नोव्हेंबर रोजी संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शाळेतील मुलींची गळती थांबावी व विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी शासनाकडून मानव विकास कार्यक्रम अंतर्गत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या व शाळेपासून ५ किमी अंतरावरील गरजू मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जातात. यावर्षी सायकलसाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी २६ नोव्हेंबर रोजी संबधित शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.मुलींना मोफत सायकल वाटपासाठी लागणाºया निधीस तांत्रिक मान्यता मिळाली. त्यानंतर १७ आॅक्टोबर रोजी जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाच्या खात्यावर मानव विकासकडून ६८ लाख ३२ हजार रूपये निधी वर्ग करण्यात आला. माध्यमिक शिक्षण विभागातर्फे हा निधी संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रीया सुरू होती. अखेर उशिराने का होईना, निधी वर्गचे काम अंतिम टप्यात आले असून २६ नोव्हेंबर रोजी सदर रक्कम जमा केली जाणार आहे. सायकल वाटप योजनेतील निधी वर्गची कामे सुरू असून येत्या, सोमवारी रक्कम शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग होईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.शिक्षण विभागाकडून मानव विकासकडे लाभार्थी मुलींच्या याद्या वेळेत पोहोचत नाहीत. संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांनी सदर याद्या जिल्हा कार्यालयाकडे वेळेत सादर केल्यास मुलींनाही शैक्षणिक कालावधीत योजनेचा लाभ मिळू शकतो. परंतु याकामी दिरंगाई होते, शिवाय नियोजनाच्या अभावामुळे मात्र अर्धे शैक्षणिक वर्षे उलटूनही मुलींच्या हातात सायकली पडत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींची पायपीट होऊन गैरसोय होते. वेळोवेळी याद्या सादर करण्याचे पत्रकही पाठविले जाते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.लाभार्थी मुलींना सायकल खरेदीसाठी ३ हजार ५०० रुपये रक्कम बँक खात्यावर जमा केली जाते. सायकल खरेदी करण्यासाठी प्रथम लाभार्थी विद्यार्थिनीच्या खात्यावर २ हजार रूपये जमा केले जाणार आहेत. उर्वरीत १ हजार ५०० रुपए सायकल खरेदी केल्याची पावती दाखल केल्यानंतर बँकेत जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये हिंगोली ६६६, सेनगाव ६६६ तर औंढा नागनाथ ६२० एकूण १ हजार ९५२ लाभार्थी विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदSchoolशाळा