शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त वसाहत योजना अद्याप थंडावलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:17 IST

स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त सामाजिक प्रवाहात आलेले नाहीत. त्यामुळे ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत’ विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना राहण्यासाठी घर बांधून दिले जाणार आहे. मात्र दोन ते तीन वर्षांपासून या योजनेत केवळ जागेचा शोधच घेतला जात असल्याचे जो येईल ते अधिकारी सांगून मोकळा होत असल्याचे गंभीर चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त सामाजिक प्रवाहात आलेले नाहीत. त्यामुळे ‘यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत’ विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना राहण्यासाठी घर बांधून दिले जाणार आहे. मात्र दोन ते तीन वर्षांपासून या योजनेत केवळ जागेचा शोधच घेतला जात असल्याचे जो येईल ते अधिकारी सांगून मोकळा होत असल्याचे गंभीर चित्र आहे.या योजनेत विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबाचा शोध घेतला जातो. त्यांचे राहणीमान उंचावावे, तसेच त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत वाढावा, त्यांना जमीन उपलब्ध करुन देत वसाहत उभी करणे, तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे, या लाभार्थ्यांसाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत २० टक्के लाभार्थ्यांचा सहभाग, २० टक्के शासनामार्फत बांधकाम अनुदान आणि ५० टक्के वित्त संस्थाकडून कर्ज उभारणी संस्थेतर्फे केली जाते. तर ५० हजारांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना ६० ते १ लाख रुपये अनुदानाची रक्कम मंजूर केली जाते. वसाहत निर्मित्तीसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते. वसाहतीत पाणीपुरवठा, वीजपुरवठा, गटारे, सेफ्टी टँक, अंतर्गत रस्ते आदी सुविधा पुरविल्या जातात. परंतु विशेष बाब म्हणजे या योजनेत अजूनही लाभार्थ्यांचा शोध घेत असल्याचे तेव्हढे मात्र अधिकारी सांगत आहेत. हिंगोली पासून जवळच असलेल्या कोथळज व कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या दोन गावांची पाहणी अनेक महिन्यांपूर्वीच केली आहे. पाहणीचे काम आटोपल्यानंतर मात्र पुढील प्रक्रियेला काही अजून गती आलेली नाही.या योजनेत लाभ देण्यासाठी वाकोडी आणि कोथळज या दोन गावांची पाहणी केली आहे. परंतु जमिनीचे भाव पाच लाखांच्या वर सांगितले जात असल्याने जमीन हस्तांतरण रखडत आहे. पाच लाखांच्या आत जमिनीचा भाव असेल तर योग्य आहे. अन्यथा विभागाच्या अपेक्षेपेक्षा जास्त भाव असल्याचे वरिष्ठांना कळविण्यात येणार आहेत. तसेच मार्च नंतर या योजनेच्या कामाकडे कटाक्षाने लक्ष देणार असल्याचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी सांगितले.