शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरीत एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडली चार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 23:25 IST

तालुक्यातील शिवणी येथील तीन तर बाभळी येथील एक घर चोरट्यांनी १६ डिसेंबरच्या मध्यरात्री फोडून ५० ते ६० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देऐवज लंपास : चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यातील शिवणी येथील तीन तर बाभळी येथील एक घर चोरट्यांनी १६ डिसेंबरच्या मध्यरात्री फोडून ५० ते ६० हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.शिवणी येथील रामराव हरण यांच्या घरात चोरट्यांनी गेटचे लॉक तोडून आत प्रवेश केला त्यांच्या घरातील ४ हजार रुपये नगदी लंपास केले. कपाट उघडत असताना हरण कुटूंबियांना जाग आली. आरडाओरड केल्यानंतर चोरटे पसार झाले. त्यानंतर चोरटे यशवंतराव हरण यांच्या घरी गेले. त्यांच्या दरवाजाची कडी कोंडा काढून आत प्रवेश केला. त्यांचे नगदी १६ हजार व ३० हजाराची मन्याची पोत लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी माधवराव जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडले परंतु त्यांना तेथे काहीच सापडले नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बाभळीकडे वळविला. चोरट्यांनी माधवराव शिंदे यांचे चक्कीचे घर असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथेही त्यांना काहीच सापडले नाही. ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविली. पोनि जी.एस. राहिरे, रोहिदास राठोड यांनी घटनेची पाहणी केली व ठसेतज्ञ श्वानपथकाला पाचारण केले. श्वानाने पाणंद रस्त्यापर्यंत माग दाखविला. त्या दिशेने पोलीस प्रशासनाकडून शोध घेतला जात आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. जिल्ह्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरीकांत भीतीचे वातारवण निर्माण झाले. चोरट्यांचे टोळके रात्री सक्रीय होत आहे.