शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाव केंद्रांचा पत्ता मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:52 IST

बाजार समिती, खरेदी विक्री संघाला नाफेडमार्फत हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यात अपशय आल्यानंतर आता शेतकरी उत्पादक कंपन्यांचा फंडा समोर आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना याबाबत काहीच माहिती नाही. नोंदणी कुठे करायची अन् कोण माल खरेदी करणार याचा अद्यापही ताळमेळ नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बाजार समिती, खरेदी विक्री संघाला नाफेडमार्फत हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यात अपशय आल्यानंतर आता शेतकरी उत्पादक कंपन्यांचा फंडा समोर आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना याबाबत काहीच माहिती नाही. नोंदणी कुठे करायची अन् कोण माल खरेदी करणार याचा अद्यापही ताळमेळ नाही.मागील तीन वर्षांपासून शेतकरी मातीमोल भावाने आपला माल विकत आहे. नाफेडचे खरेदी केंद्र तर शेतकºयांची लूटमार करण्याचे शासन देखरेखीखालील केंद्र बनले होते. ज्यांच्या हाती हमीभावाचे कोलीत आले, त्यांनी आगच लावण्याचे काम केल्याचे एकंदर चित्र जिल्हाभरातील केंद्रांवर पहायला मिळाले. नोंदणीपासून ते माल वेळेत खरेदी करण्यापर्यंत सर्वच बाबींसाठी दाम मोजायला लागला होता. यंदा त्यातून सुटकारा मिळेल, असे वाटत होते. पहिल्यांदाच सोयाबीनची आर्द्रता तपाण्यासाठी मशिनही दाखल झाल्या होत्या. मात्र हा सर्व शेतकºयांची दिशाभूल करण्यासाठी फार्स होता, असेच दिसून येत आहे. मोंढ्यात मातीमोल भावाने शेतकरी आपला माल विकत आहे. हमीभाव केंद्राचा मात्र पत्ता नाही. हमीभावाने मालाची खरेदी करण्यासाठी काही शेतकरी उत्पादक कंपन्यांना आदेशित केल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यासाठी अधिकृतपणे कोणी घोषणा केली नाही. शेतकºयांनाही त्याची माहिती नाही. त्यामुळे कुणी खरेदी-विक्री संघ तर कुणी बाजार समितीत विचारणा करीत आहे. यात काहीजण तर आपोआपच दलालांच्या गळाला लागत आहेत. परंतु नेमकी खरेदी कोण करणार? नोंदणी कुठे करायची? माल कुठे आणायचा? याची उत्तरे शेतकºयांना मिळेपर्यंत तर मोंढ्यातच पूर्ण माल विकावा लागू शकतो, असे चित्र आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार