शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:55 IST

मागील अनेक वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. इमारत बांधकामासाठी आगाराकडून हालचाली सुरू झाल्या असून प्रभारी आगारप्रमुख यांनी स्थानकातील आस्थापनेअंतर्गत येणारी दुकाने व हॉटेलचालकांनाही याबाबत नोटिसा दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक वर्षांपासून हिंगोली बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. इमारत बांधकामासाठी आगाराकडून हालचाली सुरू झाल्या असून प्रभारी आगारप्रमुख यांनी स्थानकातील आस्थापनेअंतर्गत येणारी दुकाने व हॉटेलचालकांनाही याबाबत नोटिसा दिल्या आहेत. साडेचार कोटी रुपयांचा खर्च करून या ठिकाणी बसस्थानकाची टोलेजंग इमारत उभी राहणार आहे.हिंगोली बसस्थानकाची इमारत जिर्ण झाल्याने ती पाडून नवीन इमारतीचे सुसज्ज बांधकाम केले जाणार आहे. बांधकामासाठी साडेचार कोटींचा खर्च येणार असून यापूर्वीच निधीस मंजुरी मिळाली होती. मागील अडीच वर्षांपासून नवीन इमारतीचा प्रस्ताव परभणी येथील विभागीय कार्यालयात पडून होता. ई-निविदा तसेच इतर तांत्रिक अडचणींमुळे येथील नवीन इमारतीच्या बांधकामास मुहूर्त मिळत नव्हता. परंतु उशिराने का होईना आता, नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला असून ३१ मेपर्यंत हिंगोली आगाराअंतर्गत येणारे हॉटेल व दुकाने काढून घेण्यात येणार आहेत. याबाबत संबंधितांना आगरप्रमुख बी. बी. झरीकर यांनी नोटिसाही दिल्या आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जुने बसस्थानक पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत उभी राहण्यास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे आता हिंगोलीकरांना आगारातील विविध सुविधांचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. जुने स्थानक पाडल्यानंतर लवकरच बांधकामास प्रांरभ केला जाईल, असे विभागीय नियंत्रक सिरसाट यांनी सांगितले.विविध तांत्रिक अडचणी व जागेच्या प्रश्नामुळे हिंगोली येथील नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव दीड ते दोन वर्षांपासून गुलदस्त्यातच होता. विभागीय कार्यालय परभणी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानकास अनेकदा भेटीही दिल्या होत्या. परंतु इमारत बांधकामाचा प्रश्न प्रलंबितच होता. बसस्थानकाची जिर्ण इमारत पूर्णत: मोडकळीस आली आहे. शिवाय येथील असुविधांमुळे समस्यांचे माहेरघर बनत चालले असून विशेष म्हणजे स्थानकातील साफसफाईचा प्रश्नही गंभीर आहे. मागील अनेक वर्षांपासून स्थानकाची साधी रंगरंगोटीही करण्यात आली नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकात ये-जा करणाºया प्रवाशांचीही मोठी वर्दळ असते. शिवाय इतर आगारांच्या तुलनेत हिंगोली आगाराचे उत्पन्नही अधिक आहे. परंतु नवीन इमारतीचा प्रश्न मार्गी लागत नव्हता.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळBus Driverबसचालक